चिपळुणात वीज कर्मचाऱ्यांना मारहाण; एका ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:29 IST2021-03-25T04:29:50+5:302021-03-25T04:29:50+5:30
चिपळूण : थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांना एका ग्राहकाने मारहाण केल्याची घटना काविळतळी येथे मंगळवारी रात्री ८.४५ ...

चिपळुणात वीज कर्मचाऱ्यांना मारहाण; एका ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल
चिपळूण : थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांना एका ग्राहकाने मारहाण केल्याची घटना काविळतळी येथे मंगळवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात एका ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद वीज कर्मचारी धनवंत विठ्ठल जाधव यांनी दिली आहे. यानुसार विजय आणि त्यांचे सहकारी उमेश पांडुरंग दरवडा हे दोघेजण काविळतळी परिसरात वीज बिल वसुलीसाठी गेले होते. यावेळी ग्राहक मोहसीन दाऊद मुकादम यांच्या सदनिकेत जाऊन थकीत वीज बिलासंदर्भात विचारणा केली. यावेळी वीज पुरवठा खंडित करण्यावरून मुकादम यांना राग आला. त्यांनी धनवंत जाधव यांना मारहाण केली. यावेळी उमेश पुढे आले असता उमेश यांनाही मारहाण झाली.
धनवंत जाधव यांनी मुकादम यांच्याविरोधात तक्रार दिली असून मोहसिन यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.