मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:36 IST2021-09-06T04:36:32+5:302021-09-06T04:36:32+5:30

दापोली : मित्राच्या घरी वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या मित्राला क्षुल्लक कारणावरून लोखंडी सळईने मारहाण केल्याची घटना ३ रोजी पहाटे ४ ...

Beating at a friend's birthday party | मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत मारहाण

मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत मारहाण

दापोली : मित्राच्या घरी वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या मित्राला क्षुल्लक कारणावरून लोखंडी सळईने मारहाण केल्याची घटना ३ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुहास मधुकर शिर्के (रा. काळकाई कोंड, दापोली) याने फिर्याद दिली आहे. ताे आपला मित्र माणिक जयंत आवटी (रा. गिम्हवणे, सोनारवाडी) याच्याकडे त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी २ सप्टेंबर रोजी केक व इतर साहित्य घेऊन गेला होता. रात्री दोघांनी मद्यप्राशन करून यातील शिर्के आणि माणिक आवटी यांच्यामध्ये दूरदर्शन लावण्यावरून वाद झाला होता. पहाटे ४ च्या सुमारास शिर्के आपल्या घरी जाण्यासाठी निघाला असता आवटी याने त्याला गेटवर लोखंडी सळईने मारहाण करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Beating at a friend's birthday party