किरकाेळ कारणातून वडिलांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST2021-07-07T04:39:22+5:302021-07-07T04:39:22+5:30

रत्नागिरी : किरकोळ कारणातून वडिलांना मारहाण केल्याची घटना निवेंडी-शीतपवाडी (ता. रत्नागिरी) येथे साेमवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. याप्रकरणी ...

Beating father for trivial reasons | किरकाेळ कारणातून वडिलांना मारहाण

किरकाेळ कारणातून वडिलांना मारहाण

रत्नागिरी : किरकोळ कारणातून वडिलांना मारहाण केल्याची घटना निवेंडी-शीतपवाडी (ता. रत्नागिरी) येथे साेमवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. याप्रकरणी जयगड पोलीस स्थानकात नीलेश महादेव मालप (३३, रा. निवेंडी शीतपवाडी) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

त्याच्याविरोधात त्याचे वडील महादेव सदाशिव मालप (७०, रा. निवेंडी, शीतपवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी नीलेश दारू पिऊन घरी आला हाेता. त्याने वडिलांना बोटीवर कामाला येण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी आपण बाेटीवर कधी काम केलेले नसल्याचे सांगून नकार दिला. गणपतीपुळे येथील हॉटेल सुरू झाल्यावर तिथे काम करण्यास जाईन, असे त्यांनी मुलाला सांगितले.

त्याचा राग आल्याने नीलेशने वडिलांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर लोखंडी ब्रॅकेट त्यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत.

Web Title: Beating father for trivial reasons