बासितअल्ली नेवरेकर सुवर्णपदकाने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:37+5:302021-09-11T04:32:37+5:30
लांजा : शहरातील बासितअल्ली सादिक नेवरेकर याने पेट्रो केमिकल इंजिनिअरिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून पदवी प्राप्त केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

बासितअल्ली नेवरेकर सुवर्णपदकाने सन्मानित
लांजा : शहरातील बासितअल्ली सादिक नेवरेकर याने पेट्रो केमिकल इंजिनिअरिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून पदवी प्राप्त केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे, रायगड या कॉलेजचा २३वा वार्षिक समारोह ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, दीपक फाटक, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्ता तानपुरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, व्हाइस चॅन्सलर अनिरुद्ध पंडित उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये सन २०१८-१९ या वर्षांतील विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी पेट्रो केमिकल बॅचलर ऑफ टेक्नोलॉजीकरिता ६५१ विद्यार्थी होते. यामध्ये बासितअल्ली सादिक नेवरेकर याने प्रथम क्रमांक पटकावले. त्याला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले.