शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बारसू पेटलं! स्थानिकांचा उद्रेक, पोलिसांकडून लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 15:40 IST

लोकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी अश्रूधुर सोडले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची प्रकृतीही ढासळली.

रत्नागिरी - बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आता आंदोलन तीव्र झाले आहे. पोलिसांनी या परिसरात कलम १४४ लागू केले होते. परंतु ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रिफायनरी विरोधात मोर्चा काढण्याचं ठरवले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक जमले होते. या आंदोलनाची तयारी करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर स्थानिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. 

बारसू येथे महिला आणि युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना ज्याठिकाणी सर्वेक्षण सुरू होते तिथे लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. परंतु पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं दिसून आले. लोकांचा जमाव मोठ्या संख्येने असल्याने पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला. 

लोकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी अश्रूधुर सोडले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची प्रकृतीही ढासळली. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे माणसांची पळापळ झाली. अश्रू धुर सोडल्याने लोकांना चालता येत नव्हते. समोरचे दिसायचे बंद झाले. अनेकांच्या डोळ्यांना जळजळ सुरू झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून सर्वेक्षण स्थळावरून लोकांना हटवले. 

दरम्यान, गेल्या ३-४ दिवसांपासून प्रशासन तिथल्या लोकांची चर्चा करतेय. त्यात संवाद झाला आहे. परंतु काही लोकांना हे रुचत नाही. भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काहीजण राजकारण करायचा प्रयत्न करतंय. चर्चेला सरकार कालही तयार होते, आजही तयार आहे. भविष्यातही तयार आहोत. शेतकऱ्यांना डावलून सरकार प्रकल्प पुढे रेटणार नाही, गावागावांत जाऊन प्रशासन लोकांच्या शंका दूर करेल असं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

राजापूरच्या गेस्टहाऊसमध्ये कुणी बैठक घेतली?काहीजण लोकांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत ते थांबवावे. शेतकऱ्यांना पुढे करून ज्यापद्धतीने राजकारण केले जातेय हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय घातक राजकारण आहे. खासदारांना काय शंका असतील त्या दूर करू. सर्वेक्षणाठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना ताब्यात घेतले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला तयार आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू शकतात. पण लोकांची माथी भडकावू नका. राजापूरच्या गेस्टहाऊसला कुणाची बैठक झाली? यामागचे षडयंत्र काय हे समोर आणा. पोलीस आक्रमक झालेत हे दाखवून द्यायचे आहे. स्थानिक कमी बाहेरचे जास्त आहेत. लोकांचा वापर करून राजकारण केले जातेय हे थांबवावे असंही पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.   

टॅग्स :PoliceपोलिसBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्प