शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

‘मोरया’ च्या गजरात रत्नागिरीत लाडक्या बाप्पाला निरोप 

By मेहरून नाकाडे | Updated: September 23, 2023 19:05 IST

रत्नागिरी : गेले चार दिवस उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता बाप्पाच्या विसर्जनाने झाली. ढोल ताशे, बँडपथक, बेंजोच्या तालावर मिरवणुका ...

रत्नागिरी : गेले चार दिवस उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता बाप्पाच्या विसर्जनाने झाली. ढोल ताशे, बँडपथक, बेंजोच्या तालावर मिरवणुका काढत, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ च्या जयजयकारात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील एक लाख १५ हजार २३४ घरगुती व १७ सार्वजनिक गणेशमूर्तीबरोबर गौरींचेही विसर्जन सर्वत्र करण्यात आले.भाद्रपद चतुर्थीला एक लाख ६६ हजार ९८६ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. चार दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर शनिवारी गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गौरीसह मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असल्याने शहरातील मांडवीसह जिल्ह्यातील प्रमुख विसर्जनस्थळांवर पोलीस यंत्रणेकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

चौथ्या दिवशी गौरीसमवेत विसर्जन करणाºया गणेशमूर्तींची संख्या मात्र जिल्ह्यात सर्वाधिक होती. रात्री १२ वाजेपर्यंतच मिरवणूकीत वाद्य वाजविण्यासाठी शासनाने परवानगी दिली असल्याने तत्पूर्वी विसर्जनासाठी भाविकांची घाई झाली होती. त्यामुळे विसर्जन घाटावर भाविकांची गर्दी फुलली होती.दुपारी आरतीनंतर अनेक भाविकांनी गणेशमूर्ती मखरातून बाहेर काढल्या होत्या. दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असल्याने सवाद्य विसर्जन मिरवणूका, गुलालाची उधळण करीत काढण्यात आल्या. हातगाडी, रिक्षा, कार, बोलेरो, टेम्पो, ट्रकमधून गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येत होत्या. ग्रामीण भागात तर महिला पुरूषांनी डोक्यावर गणेशमूर्ती घेतली होती.काही भाविक निरोपाची आरती घरून करून आले होते तर काही भाविकांनी विसर्जन घाटावर आरती केली. शहरातील मांडवी किनाऱ्यावर विसर्जनासाठी भाविकांची दुपारपासूनच ये-जा सुरू होती. विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. निर्माल्य संकलनासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती.

समुद्रकिनाऱ्यावर गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी खास काही मंडळी कार्यरत होती. त्यामुळे भाविक आरती केल्या नंतर संबंधित मंडळीकडे गणेशमूर्ती सुपूर्द करीत होते. निर्माल्य संकलनासाठी खास स्वयंसेवक कार्यरत होते. सामाजिक संस्थाही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. नगर परिषदेतर्फे निर्माल्य संकलनासाठी खास कलशकुंड, वाहनांची व्यवस्था मांडवी किनाऱ्यावर केली होती. मांडवी किनाऱ्यावर वाहनांची होणारी गर्दी टाळण्यासाठी पार्किंग अन्यत्र करण्याची पोलिस सूचना करीत होते. फक्त गणेशमूर्ती घेवून जाणाऱ्या वाहनांना किनाऱ्यापर्यंत जाण्याची सूचना करण्यात आली होती.परतीसाठी एसटी सुविधागौरी गणपती सणासाठी मुंबई-पुण्याहून आलेले काही भाविक विसर्जनानंतर लगेचच परतीच्या प्रवासाला निघाले होते. आधीच एसटी, कोकण रेल्वे, खासगी गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. रत्नागिरी विभागातील २१३ बसेस मुंबईसाठी शनिवारी सायंकाळी रवाना झाल्या. कोकण रेल्वे स्थानकांवरही प्रवाशांची गर्दी झाली होती.

चिपळुणात 32 हजार गणरायांना निरोपचिपळूण : ढोल ताशांचा गजर.. टाळ  मृदंगाचा निनाद, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि जलधारांच्या वर्षावात पाच दिवसांच्या गौरी  गणपतीचे शनिवारी मोठया उत्साहात विसर्जन करण्यात आले. शहर परिसरात असलेल्या वाशिष्टी नदीमध्ये व ग्रामीण भागात ठिकठिकाणीच्या नैसर्गिक जलस्त्रोतांवर बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.तालुक्यातील ग्रामीण भागात देखील शनिवारी दुपारी 3 वाजल्या पासून विसर्जन सुरू झाले. सावर्डे परिसरामध्ये १०२४०,अलोरे परिसर ५८५०  तर चिपळूण परिसरात १६५४०  गणपतींचे मोठ्या उत्साहात विसर्जन झाले. शहरातील विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या गणेश विसर्जन स्थळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी भेट देऊन नागरिकांना स्वच्छतेविषयी प्रोत्साहीत केले. विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी