शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: बांग्लादेशी महिलेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:42 IST

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे अवैधरीत्या वास्तव्य केल्याचा आरोप असलेल्या बांगलादेशी महिलेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. सलमा ...

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे अवैधरीत्या वास्तव्य केल्याचा आरोप असलेल्या बांगलादेशी महिलेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. सलमा खातून बिलाल मुल्ला ऊर्फ सलमा राहिल भोंबल (वय ३०, रा. साळवी स्टॉप रत्नागिरी, मूळ रा. बांगलादेश) असे या महिलेचे नाव आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी तिला दहशतवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती.अडीच महिने कारागृहात असलेल्या सलमाने जामिनासाठी सत्र न्यायालयासमोर अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्यासमोर या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सलमा १६ डिसेंबर २०१६ रोजी ९० दिवसांचा व्हिसा घेऊन भारतात आली होती. यावेळी तिचे वास्तव्य शृंगारतळी (गुहागर) येथे होते. यानंतर सलमाने राहिल भोंबल याच्याशी विवाह केला. व्हिसाची मुदत संपली असतानाही तिने २०१७ ते २०२५ या कालावधीत अवैधरीत्या भारतात वास्तव्य केले.

सलमाने आधार कार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला, आदी बनावट कागदपत्रे तयार करत भारतात वास्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. तिला १७ जोनवारी रोजी साळवी स्टॉप येथून अटक करण्यात आली होती. संशयित आरोपी ही एक महिला आहे, तिची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. जामीन दिल्यास पोलिसांच्या तपासकार्यात सहकार्य केले जाईल. तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन केले जाईल, असे सलमाच्या वतीने वकिलांनी मांडले.सरकार पक्षाकडून जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. संशयित आरोपीने केवळ भारतात अवैध वास्तव्य केले नाही, तर तिने बनावट कागदपत्रे तयार करून घेतली आहेत. याकामी तिला अन्य कुणीतरी मदत केली असण्याची शक्यता आहे. ही बाजू मान्य करून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCourtन्यायालयBangladeshबांगलादेशWomenमहिला