शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी महिलेला चिपळुणातून दिला जन्म दाखला, चौकशी दरम्यान धक्कादायक प्रकार उघड 

By संदीप बांद्रे | Updated: January 23, 2025 17:33 IST

पंचायत समिती पडताळणी करून अहवाल रत्नागिरी पोलिसांना पाठविणार 

चिपळूण : रत्नागिरी येथे सापडलेल्या बांगलादेशी महिलेने सादर केलेल्या जन्म दाखला चिपळूण पंचायत समितीच्या नावाने देण्यात आला होता. चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मात्र मुळात हा दाखलाच संशयास्पद व बनावट असण्याची शक्यता आहे. या जन्म दाखल्याची रजिस्टरवरील नोंद देखील संशयास्पद आहे. या दाखल्याची पडताळणी करून त्याचा अहवाल चिपळूण पंचायत समितीकडूनरत्नागिरी शहर पोलिसांना लवकरच पाठविण्यात येणार आहे.रत्नागिरी पोलिसांनी चिपळूण पंचायत समितीकडे सनमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सनमा राहिल बोंबल यांच्या जन्म दाखल्याची पडताळणी करण्यास कळवले आहे. तसेच जन्म दाखल्याच्या रजीस्टरवरील नोदींची प्रत मागितली आहे. सनमा बिलाल मुल्ला यांचा जन्म सावर्डे येथे १९९४ मध्ये झाल्याची नोंद घालण्यात आली आहे. त्यांचा कायमचा पत्ता हा गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील दाखवला आहे. हा जन्म दाखला १८ मार्च २०२१ रोजी चिपळूण पंचायत समितीमधून देण्यात आला. अबिदा बिलाल मुल्ला यांनी ही जन्म नोंद केली आहे.चिपळूण पंचायत समिती प्रशासनाकडून दाखल्याची पडताळणी सुरू आहे. या जन्म दाखल्याच्या रजीस्टरची पडताळणी केल्यानंतर विविध संशयास्पद बाबी समोर येत आहेत. या दाखल्यावर गटविकास अधिकाऱ्यांचा शिक्का आहे. त्याखाली निबंधक जन्म मृत्यू अधिकारी असा शिक्का आहे. मात्र प्रत्यक्षात चिपळूण पंचायत समितीकडून देण्यात येणाऱ्या दाखल्यावर अप्पर निबंधक जन्म मृत्यू अधिकारी असा शिक्का मारला जातो. त्यामुळे या दाखल्यावर संशय व्यक्त केला जात आहे.       जन्म दाखल्यावरील नोंदीत देखील अनेक त्रुटी राहिल्या आहेत. संबंधीताने मागणी केल्याचा आवक क्रमांक देखील येथे टाकण्यात आलेला नाही. मार्च २०२१ मध्ये पंचायत समितीमध्ये जे गटविकास अधिकारी कार्यरत होते. त्यांची सही आणि प्रत्यक्षात दाखल्यावरील सही यात देखील फरक आहे. त्यामुळे हा दाखला चिपळूण समितीने दिला कि तो परस्पर तयार करण्यात आला, याबाबत उलट सुलट चर्चा.

रत्नागिरी पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार संबंधीत जन्म दाखल्याची पडताळणी पंचायत समितीकडून केली जात आहे. पडताळणी पुर्ण झाल्यानंतर याबाबतचा अहवाल सबंधितांना पाठवला जाईल. - उमा घार्गे - पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणpanchayat samitiपंचायत समितीPoliceपोलिसBangladeshबांगलादेश