शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

थाटात बारसं झालं; दूध पिऊन बाळ झोपलं, अन्..; रत्नागिरीतील ह्रदयद्रावक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:27 IST

दोन दिवसांत दुसऱ्या तान्हुल्याचा मृत्यू

रत्नागिरी : घरात बाळ आलं, म्हणून सगळे आनंदात होते. त्या आनंदमय वातावरणात थाटात बाळाचं बारसं झालं. नीरव असं नाव मिळालं त्याला; पण फक्त थोड्याच तासांसाठी. बारसं झालं आणि रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दूध पिऊन हे बाळ झोपलं ते परत उठलेच नाही. झोपेतच केव्हातरी त्याने शेवटचा श्वास घेतला असावा. कुणालाही चटका बसेल, असा हा प्रकार बुधवारी रत्नागिरीत घडला आहे.रत्नागिरीतील एका दाम्पत्याला मुलगा झाला. सगळेजण खूप आनंदात होते. बाळ आणि त्याची आई रुग्णालयातून घरी आले. अत्यंत आनंदात या कुटुंबाने बाळाचं बारसं केलं आणि बाळाचं नाव नीरव ठेवलं. मंगळवार, दि. २८ रोजी सायंकाळी ६ वाजता हे बारसं झालं. नातेवाईक, मित्रमंडळी आली होती. रात्री साडेअकरा-बारा वाजता सर्व कार्यक्रम आटोपला. १२ वाजता नीरव खेळत होता. मध्यरात्रीनंतर दोन वाजता नीरव दूध प्यायला आणि झोपला.बुधवार, दि. २९ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तान्हुल्या नीरवच्या आईला जाग आली. त्यावेळी नीरवचे अंग गार पडले असल्याचे आणि त्याच्या नाकातून रक्त येत असल्याचे तिच्या लक्षात आले. तातडीने नीरवला माळनाका येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून दुसऱ्या आणि त्यानंतर तिसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून नीरवला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासले. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. तान्हुल्याच्या अशा जाण्याने सगळ्यांनाच चटका बसला आहे.

दोन दिवसांत दुसऱ्या तान्हुल्याचा मृत्यूदुर्दैवाने दोनच दिवसांपूर्वी चिपळूण तालुक्यातही दोन दिवसांच्या तान्ह्या बाळाचा मृत्यू झाला आहे. मोजून दोन दिवस एवढेच वय असलेलं ते बाळ रात्री दूध पिऊन झाेपले आणि पहाटे ते गार पडलेले होते. त्यापाठोपाठ आता रत्नागिरीतही अशी दुर्दैवी घटना घडली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Joy turns to tragedy: Infant dies after naming ceremony.

Web Summary : Ratnagiri family's joy turned to grief as their newborn, Neerav, passed away unexpectedly after his naming ceremony. The baby was fed and put to sleep but was found unresponsive the next morning. Another similar infant death occurred in Chiplun recently.