शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

बा गावदेवी, खवले मांजरांचे रक्षण कर, ग्रामस्थांनी  घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 17:16 IST

खवले मांजराच्या नावाने चांगभलंह्ण म्हणत डुगवे ग्रामस्थांनी खवले मांजराला पालखीत घालून नाचविले, वेळ होती खवले मांजराच्या नावाने चांगभलं म्हणत डुगवे ग्रामस्थांनी खवले मांजराला पालखीत घालून नाचविले, वेळ होती डुगवेतील खवलोत्सवाची. बा गावदेवी आमच्या गावात खवले मांजर आहे, त्याचे रक्षण कर, त्यांची संख्या वाढव, तसेच तस्करी, चोरटा व्यापार यात अडकलेल्या लोकांना चांगली बुद्धी दे, जगातील सर्व खवले मांजर प्रजातीचे रक्षण कर असे गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी सर्व ग्रामस्थांनी खवले मांजराच्या रक्षणाची शपथ घेतली.

ठळक मुद्देचिपळूण तालुक्यातील डुगवे येथे खवलोत्सवखवले मांजराच्या रक्षणाची घेतली शपथ

चिपळूण : खवले मांजराच्या नावाने चांगभलं म्हणत डुगवे ग्रामस्थांनी खवले मांजराला पालखीत घालून नाचविले, वेळ होती डुगवेतील खवलोत्सवाची. बा गावदेवी आमच्या गावात खवले मांजर आहे, त्याचे रक्षण कर, त्यांची संख्या वाढव, तसेच तस्करी, चोरटा व्यापार यात अडकलेल्या लोकांना चांगली बुद्धी दे, जगातील सर्व खवले मांजर प्रजातीचे रक्षण कर असे गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी सर्व ग्रामस्थांनी खवले मांजराच्या रक्षणाची शपथ घेतली.कोकणात सध्या खवले मांजर या प्राण्याच्या चोरट्या शिकारीचे प्रमाण वाढले असून, वेळोवेळी त्याच्या तस्करीच्या घटना उघडकीस येत आहेत आहेत. मात्र, चिपळूण तालुक्यातील डुगवे गावातील ग्रामस्थ मात्र या प्राण्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी सरसावले आहेत.

या गावात चक्क खवलोत्सव म्हणजेच खवले मांजर महोत्सव साजरा करण्यात आला आहे. डुगवे या लहानशा गावानेदेखील खवले मांजर संरक्षणाचे काम करण्याचा विडा उचलला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून जागतिक खवले मांजर दिनानिमित्त १५ फेब्रुवारी रोजी डुगवे गावामध्ये खवलोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाला सावर्डे येथील वनपाल राजश्री कीर उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डुगवेच्या सरपंच नेहा तांडकर, माजी सरपंच महेंद्र कदम, उपसरपंच चंद्रकांत तांडकर, पोलीसपाटील श्रीधर कदम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जयराम कदम, देवस्थानाचे मानकरी रमाकांत पाटकर, राजेंद्र अंतरकर, भागोजी तांडकर, चंद्रकांत साखरकर, सीताराम तांडकर, विठ्ठल तांडकर, राजाराम कदम, सह्याद्री निसर्गमित्रचे कार्यकर्ते, वन विभाग व पोलिसांचे सहकार्य लाभले.प्रतिकृतीची पालखीखवलोत्सवानिमित्त खवले मांजराची प्रतिकृती ठेवून गावातून पालखी सजविण्यात आली होती. ही पालखी घराघरात फिरवण्यात आली. ग्रामस्थांनी भक्तिभावाने खवलेमांजराचे औंक्षण केले. पालखी परत सहाणेवर बसली, तेथे खेळे/ नमन सादर करण्यात आले. त्यात खवल्याचे सोंगसुद्धा आले. कार्यक्रमाच्या शेवटी डुगवे ग्रामस्थ, सह्याद्री निसर्गमित्रचे कार्यकर्ते, वन विभाग, पोलीस या सर्वांच्यावतीने ग्रामदेवतेला साकडे घालण्यात आले. 

टॅग्स :environmentपर्यावरणwildlifeवन्यजीवRatnagiriरत्नागिरी