शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनसाठी सजगता, कोरोनाचा परिणाम, अंगणातल्या रोपांपेक्षा ५० टक्के खप अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 12:38 IST

Coronavirus, nursury, sangli कोरोना काळात ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या, हवा शुद्ध करणाऱ्या इनडोअर रोपांना सध्या मागणी वाढली आहे. कोरोनापूर्वी असलेल्या मागणीत ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दरमहा जिल्ह्यात ५० लाखांहून अधिक इनडोअर रोपांची आवक होऊ लागली आहे.

ठळक मुद्देऑक्सिजनसाठी सजगता, कोरोनाचा परिणामअंगणातल्या रोपांपेक्षा ५० टक्के खप अधिक

अविनाश कोळी 

सांगली : कोरोना काळात ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या, हवा शुद्ध करणाऱ्या इनडोअर रोपांना सध्या मागणी वाढली आहे. कोरोनापूर्वी असलेल्या मागणीत ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दरमहा जिल्ह्यात ५० लाखांहून अधिक इनडोअर रोपांची आवक होऊ लागली आहे.जिल्ह्यात सध्या लोणावळा, पुणे, कोकण परिसरातून मोठ्या प्रमाणावर इनडोअर रोपे येऊ लागली आहेत. दिवसा ऑक्सिजन देणाऱ्या व रात्री ऑक्सिजन घेणाऱ्या झाडांपेक्षा चोवीस तास ऑक्सिजन देणाऱ्या व घरातील वातावरणात जगणाऱ्या वनस्पतींना अचानक मागणी वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात याची गेल्या सात महिन्यांत कोट्यवधीची उलाढाल झाली असून, मागणी आणखी वाढण्याचा नर्सरी मालकांचा अंदाज आहे. अंगणातील रोपांची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील अनेक नर्सरी मालकांनी आता इनडोअर नर्सरी सुरू केल्या आहेत.हवेच्या शुद्धीकरणाबरोबरच यातील काही वनस्पतींची पाने, फुले आकर्षक असल्यामुळे त्यांना दिवसेंदिवस ग्राहकांची मागणी वाढत आहे.सांगलीतील नर्सरीमालक जयंत साळुंखे यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून घराबाहेर वाढणाऱ्या वनस्पतींपेक्षा घरात चोवीस तास ऑक्सिजन देणाऱ्या रोपांना ५० टक्के अधिक मागणी आहे. याशिवाय कमी देखभाल असल्यानेही त्यास पसंती मिळत आहे.घरातल्या बागांना अधिक पसंतीअपार्टमेंट, दाटीवाटीच्या जागांमुळे अनेकांच्या वाट्याला अंगण येत नाही. त्यामुळे ते आता इनडोअर बागा, टेरेस बागा फुलविण्यात रमले आहेत. इनडोअर रोपांची फार देखभाल करावी लागत नाही. घरातील सजावटीलाही त्याचा उपयोग होतो. सध्या मागणी असलेल्या इनडोअर रोपांच्या किमती शंभर रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत आहेत. स्वस्त व महागड्या अशा दोन्ही रोपांना मागणी वाढत असल्याचा विक्रेत्यांचा अनुभव आहे.या इनडोअर वनस्पतींना आहे मागणी...अ‍ॅँथेरियम, मॉन्स्टेरा, अरेलिया, ड्रॅकेना मिल्कीवे, आर्चिड, डायफेनबाचिया, पेपरोमिया, मनी प्लांट, पीस लिली, स्नेक प्लांट, तुळशी, स्पायडर प्लांट, एरेका पाम यांना अधिक मागणी आहे. इमारतींच्या दाटीवाटीत राहणाऱ्या अनेक फ्लॅटमध्ये होणारी घुसमट हवा शुद्ध ठेवणाऱ्या रोपांच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न नागरिक करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याenvironmentपर्यावरणRatnagiriरत्नागिरी