गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्हयात सरासरी पावसाचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 01:14 PM2021-06-24T13:14:05+5:302021-06-24T13:15:12+5:30

 Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्हयात यंदा पावसाचे प्रमाण चांगले असून गेल्या वर्षाच्या ( जून 2020 ) तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये चांगला पाऊस आतापर्यंत नोंदला गेला आहे. जूनच्या पहिल्या ३ आठवडयांमध्ये जिल्हयात सरासरी ८०८.२ मिमी पाऊस झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत ६२१.८३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

The average rainfall in the district is higher than last year | गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्हयात सरासरी पावसाचे प्रमाण अधिक

गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्हयात सरासरी पावसाचे प्रमाण अधिक

Next
ठळक मुद्देगेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्हयात सरासरी पावसाचे प्रमाण अधिकजिल्ह्यात सरासरी 55.81 मिमी पावसाची नोंद

रत्नागिरी : जिल्हयात यंदा पावसाचे प्रमाण चांगले असून गेल्या वर्षाच्या ( जून 2020 ) तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये चांगला पाऊस आतापर्यंत नोंदला गेला आहे. जूनच्या पहिल्या ३ आठवडयांमध्ये जिल्हयात सरासरी ८०८.२ मिमी पाऊस झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत ६२१.८३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

गेल्या ३ आठवडयात सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात १११९.३ मिमी नोंदला गेला. मागील वर्षी या तालुक्यात याच कालावधीत ४६४.१२ मिमी पाऊस नोंदला गेला होता.

पावसाची तुलनात्मक आकडेवारी खाली प्रमाणे आहे. यात कंसातील आकडे मागील वर्षीचे आहेत. आकडे मिलिमिटर मध्ये आहेत.
मंडणगड ७२६ (४६३.३२), दापोली ५३०.६ (५६०.६९), खेड १११९.३ (४६४.१२), गुहागर ९३३.५ (६५८.७), चिपळूण ७५२.७ (५६७.०६), संगमेश्वर ८४७.८ (७२७.१), रत्नागिरी ९३१ (७१८.८), लांजा ७२५.६ (६६७.४) आणि राजापूर ६५८.५ (७६९.२५).

जिल्हयातील ९ तालुक्यांपैकी फक्त दापोली आणि राजापूर तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात कमी पाऊस आहे. मागील वर्षी जिल्हयात ६२१.८३ मिमीच्या सरासरीने ५५९६.४४मिमी पाऊस झाला. चालू वर्षात ८०८.०२ मिमीच्या सरासरीने ७२७२.२० मिमी अर्थात १६९५.७६ मिमी सरासरी पाऊस अधिक आहे.

जिल्ह्यात सरासरी 55.81 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यात 24 तासात सरासरी 55.81 मिमी तर एकूण 502.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 81.30 मिमी , दापोली 33.20 मिमी, खेड 46.90 मिमी, गुहागर 61.40 मिमी, चिपळूण 62.90 मिमी, संगमेश्वर 57.50 मिमी, रत्नागिरी 42.00 मिमी, राजापूर 42.10 मिमी,लांजा 75.00 मिमी.

 

Web Title: The average rainfall in the district is higher than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.