लांजात दुकान फोडीचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:14+5:302021-07-09T04:21:14+5:30
लांजा : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले मेडिकल दुकान फोडून ...

लांजात दुकान फोडीचा प्रयत्न फसला
लांजा : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले मेडिकल दुकान फोडून चाेरी करण्याचा चाेरट्यांचा प्रयत्न फसला. दुकानाच्या पत्र्यातून आत शिरता न आल्याने चाेरट्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले.
पावसामध्ये आजूबाजूच्या लोकांना आवाज येत नसल्याने चाेरटे सक्रिय झाले आहेत. मंगळवारी रात्री शहरातील मध्यवर्ती असलेल्या मेडिकल दुकानात चाेरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुकानाच्या मागील बाजूने जाऊन सिमेंट पत्रे उचकटून चाेरट्यांनी आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आत जाता न आल्याने त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. पण, चोरीच्या प्रयत्नासाठी मेडिकल स्टोअरवरील सिमेंट पत्रे, अँगल यांचे चोरट्यांनी फोडल्याने मोठे नुकसान झाले आहे. या चोरीच्या प्रयत्नाने पोलीस सतर्क झाले आहेत.