शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात भर बाजारपेठेत परिचारिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 18:31 IST

Crimenews Chiplun Ratnagiri : चिपळूण शहरातील भर बाजारपेठेतील भोगळे परिसरात एका २४ वर्षीय परिचारिकेवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे अवघे चिपळूण सुन्न झाला असून, सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी संबंधित नराधमाचा शोध सुरू केला आहे.

ठळक मुद्देचिपळुणात भर बाजारपेठेत परिचारिकेवर अत्याचारपोलिसांचा तपास सुरू, काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात

चिपळूण : शहरातील भर बाजारपेठेतील भोगळे परिसरात एका २४ वर्षीय परिचारिकेवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे अवघे चिपळूण सुन्न झाला असून, सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी संबंधित नराधमाचा शोध सुरू केला आहे.शहरातील भोगाळे येथे एस.टी. महामंडळाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ही घटना घडली. या जागेत अतिक्रमण हटाव मोहिमेत हटविण्यात आलेले खोके व हातगाड्या ठेवण्यात आल्या आहेत. हा भाग चारही बाजूंनी हातगाड्या व खोक्यांनी वेढलेला असल्याने संबंधित नराधमाने त्याचा फायदा उठवला.

संबंधित तरुणी बाजारपेठेतील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असून, ती रात्रपाळीसाठी मध्यवर्ती बसस्थानकात उतरली. त्यानंतर भोगाळे येथून चिंचनाक्याच्या दिशेने चालत जात असताना मागून येऊन संबंधित नराधमाने तिला ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला.सध्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठेतील दुकाने सायंकाळी ४ वाजता बंद होतात. त्यातच भोगळे परिसरात कायम अंधार असतो. त्यातच गुरुवारी येथे मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे हा रस्ता पूर्णतः निर्मनुष्य होता. त्याचा फायदा उठवत नराधमाने अत्याचार केला. यावेळी झालेल्या झटापटीत संबंधित तरुणीला दुखापत झाली आहे. तिची तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी रात्रीच याविषयी तपास सुरू केला आहे. त्यासाठी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChiplun Police Thaneचिपळूण पोलीस ठाणेRatnagiriरत्नागिरी