शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
3
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
4
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
5
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
6
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
7
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
8
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
9
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
10
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
11
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
12
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
13
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
14
विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास
15
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
16
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
17
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
18
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
19
नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा

राजापुरात अणु की सौरऊर्जा प्रकल्प?, ९५ टक्के प्रकल्पग्रस्तांनी स्वीकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:43 IST

RajapurJaitapur -राजापूर तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर माडबन अणुऊर्जा प्रकल्पाविरुध्द एक दशकाहून अधिक काळ प्रखर विरोध होत असतानाच दुसरीकडे प्रकल्प क्षेत्रातील बाधित पाच गावातील सुमारे ९५ टक्के लाभार्थ्यांनी मोबदला आणि सानुग्रह अनुदान स्वीकारले आहे.

ठळक मुद्दे९५ टक्के प्रकल्पग्रस्तांनी स्वीकारलेअनुदान प्रकल्पाविरोधातील भूमिका बदलली

राजापूर : तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर माडबन अणुऊर्जा प्रकल्पाविरुध्द एक दशकाहून अधिक काळ प्रखर विरोध होत असतानाच दुसरीकडे प्रकल्प क्षेत्रातील बाधित पाच गावातील सुमारे ९५ टक्के लाभार्थ्यांनी मोबदला आणि सानुग्रह अनुदान स्वीकारले आहे.आजपर्यंत १ हजार ८४५ खातेदारांना मूळ अनुदानापोटी १३ कोटी ६५ लाख, तर सानुग्रह अनुदानापोटी १९५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे त्या प्रकल्पातील अडथळे आता दूर झाले आहेत. मात्र, सौरऊर्जा प्रकल्पाच्या मागणीमुळे आता अणुऊर्जा प्रकल्पाचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.जगातील सर्वात मोठा असा १० हजार मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प राजापूर तालुक्यातील माडबन गावी मंजूर झाला होता. त्यासाठी जैतापूर परिसरातील माडबन, मिठगवाणे, करेली, निवेली व वरचीवाडी अशा गावातील जमिनी संपादीत केल्या होत्या.

या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यापासूनच स्थानिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. मात्र, गेल्या काही वर्षात हा विरोध मावळला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त पाच गावातील सुमारे ९५ टक्के प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांनी जमिनीचा मोबदला आणि सानुग्रह अनुदान स्वीकारून अणुऊर्जा प्रकल्पाला एक प्रकारे संमतीच दर्शविली आहे.सन २०१८ अखेर जैतापूर प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन २०२५ ला पहिला रिॲक्टर सुरु होईल व २०२७ पर्यंत सर्वच्या सर्व सहा रिॲक्टरमधून ऊर्जा निर्मिती होईल, अशी शक्यता देवेंद्र फडणवीस यांच्या काळात वर्तविण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत अणुऊर्जा प्रकल्पाचे काम ठप्प झाल्याने प्रकल्पाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.२०८ कोटींचे वाटपप्रस्तावित जैतापूर माडबन अणुऊर्जा प्रकल्प क्षेत्रात सुमारे २ हजार ३३६ प्रकल्पग्रस्त आहेत. या प्रकल्पग्रस्तांना मूळ अनुदानापोटी १४ कोटी ७७ लाख रुपये, तर सानुग्रह अनुदानापोटी २११ कोटी ५ लाख इतके अनुदान देय आहे. यापैकी १ हजार ८४५ लाभार्थ्यांनी १३ कोटी ६५ लाख रुपयांचे मूळ अनुदान स्वीकारले आहे, तर सानुग्रह अनुदानाला पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी सुमारे १९५ कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान स्वीकारले आहे. केवळ ५ टक्के लाभार्थ्यांनीच अनुदान स्वीकारलेले नाही. यापैकी काही लाभार्थ्यांचे अनुदान हे वारस तपास व न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित आहे, तर काही लाभार्थ्यांचे अनुदान अचूक पत्ते न सापडल्याने प्रलंबित आहे. 

टॅग्स :Jaitapur atomic energy plantजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पRatnagiriरत्नागिरीRajapurराजापुर