एटीएम सेवा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:07+5:302021-09-11T04:32:07+5:30
परतीसाठी जादा गाड्या राजापूर : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या मुंबईकरांसाठी दि. १५ सप्टेंबरपासून विजयदुर्ग व्हाया जैतापूर - नाटे - आडिवरे ...

एटीएम सेवा कोलमडली
परतीसाठी जादा गाड्या
राजापूर : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या मुंबईकरांसाठी दि. १५ सप्टेंबरपासून विजयदुर्ग व्हाया जैतापूर - नाटे - आडिवरे - पावस - रत्नागिरी - बोरिवली - विरार - अर्नाळा गाडी सुरू करण्यात आली आहे. या गाडीचे ऑनलाईन आरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. विजयदुर्गवरून सायंकाळी ४ वाजता गाडी सुटणार आहे. ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध केली आहे.
गणेश सजावट स्पर्धा
लांजा : युवा सेना व शिवसेना लांजा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक गणेशभक्तांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी लांजा - कुवे शहर मर्यादित घरगुती गणेश सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेते प्रथम तीन क्रमांक घोषित करण्यात येणार असून, रोख रकमेची बक्षिसे देऊन गाैरविण्यात येणार आहे.
यंत्रणेअभावी शेतकरी चिंतेत
रत्नागिरी : शासनाने ई - पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पीक पेरा स्वत: नोंदविता येणार आहे. मात्र, नेटवर्क समस्या तसेच तांत्रिक गोष्टींचा अभाव असल्याने माहिती चुकीची भरली की बरोबर शोधणे अवघड बनले आहे. शहानिशा करणाऱ्या यंत्रणेचा अभाव असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.