शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri News: चिमुकल्यांमध्ये रमली अंतराळवीर; नासा, तिच्या कार्यपद्धतीविषयी मुलांना दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 15:49 IST

नासाची महत्त्वपूर्ण संधी मिळाली आणि सातासमुद्रापार अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याचा योग आला. अंतराळवीर होण्याचे स्वप्न साकारले.

चिपळूण : नासाद्वारे अमेरिकेत अंतराळवीर बेसिक ॲडव्हान्स ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी निवड झालेल्या अंतराळवीर आरती पाटील यांनी रविवारी तालुक्यातील मुंढे येथील प्राथमिक शाळेला भेट दिली. या भेटीत शाळेतील चिमुकल्यांशी संवाद साधताना बराच वेळ त्या मुलांमध्येच रमल्या होत्या. यावेळी त्यांनी नासा व तिच्या कार्यपद्धतीविषयी मुलांना माहिती दिली.यावेळी विद्यार्थ्यांशी हितगूज करताना अंतराळवीर आरती पाटील म्हणाल्या की, आपल्याला लहान वयातच विविध आव्हाने पेलण्याची जबरदस्त इच्छाशक्ती निर्माण झाली होती. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच इंटरनेटवर वेगवेगळ्या संधी शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यावेळी नवनवीन बाबी शिकण्याची भूक वाढतच होती. नवनवी आव्हाने समोर येत होती. आर्थिक स्थिती नाजूक असतानाही इच्छाशक्ती स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच नासाची महत्त्वपूर्ण संधी मिळाली आणि सातासमुद्रापार अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याचा योग आला. अंतराळवीर होण्याचे स्वप्न साकारले.मी शिक्षिका व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती. त्यामुळेच बी. एड. करून शिक्षिका झाले. इतकेच नव्हे तर साधू-वासवानी आंतरराष्ट्रीय स्कूलची मुख्याध्यापिका म्हणूनही काम केले. लहान वयात मोठ्या जबाबदाऱ्या घेण्याची सवय शिक्षक म्हणून ठरावीक चौकटीत काम न करता चौकटीबाहेर जाऊन मुलांना शिकवावे, असे वाटायचे. या संपूर्ण वाटचालीत अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले. परंतु, अजूनही आपल्याला मोठी झेप घ्यायची असल्याचेही त्या म्हणाल्या.यावेळी ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जनार्दन खेतले, मुंढे तर्फे चिपळूणचे सरपंच मयूर खेतले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राज खेतले, मोहन पाटील, ज्ञानेश्वर नाझरे, विद्याधर जोशी, विजय मोहिते, तळसर सरपंच सिद्धी पिटले, मुंढे उपसरपंच प्रतिभा कांबळी, पोलिसपाटील विभा मोहिते, श्रीपत खेतले, गणेश खेतले, मोहन गायकवाड, बबन  खेतले, प्रमिला महाडिक, सुनील शिंदे उपस्थित होते.आगळेवेगळे प्रयोगसर्व शिक्षण संचालकांच्या अनुमतीने एक आगळावेगळा प्रयोग सुरू केला. शैक्षणिक वातावरण खूप चांगले असल्यामुळे नवनवे प्रयोग करण्याची संधी मिळाली. जगभरातल्या पंधरापेक्षा अधिक देशांच्या शैक्षणिक पद्धतींचा अभ्यास केला, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNASAनासा