युवासेना, स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानतर्फे मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:39 AM2021-09-16T04:39:58+5:302021-09-16T04:39:58+5:30

खेड : स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानच्यावतीने व शिवसेना युवासेना शाखा कोतवली यांच्या माध्यमातून नुकतीच गरजू पूरग्रस्त लोकांना मदत वाटप करण्यात ...

Assistance from Yuvasena, Shiledar Pratishthan of Swarajya | युवासेना, स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानतर्फे मदत

युवासेना, स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानतर्फे मदत

Next

खेड : स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानच्यावतीने व शिवसेना युवासेना शाखा कोतवली यांच्या माध्यमातून नुकतीच गरजू पूरग्रस्त लोकांना मदत वाटप करण्यात आली.

तालुक्यातील कोतवली परिसरातील १० गरजू कुटुंबाना धान्य किट तर १७ कुटुंबांना चादर व टाॅवेल वाटप करण्यात आले. या उपक्रमात धामणदेवी गट विभागप्रमुख संदिप आंब्रे, शाखाप्रमुख विश्वनाथ आंब्रे, माजी सरपंच सुरेश मांडवकर, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका पाष्टे, माजी उपसरपंच चंद्रगुप्त तांबे, पांडुरंग पाष्टे, ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश तांबे, माजी उपसरपंच संजय मांडवकर, युवासेना कार्यालय शाखाधिकारी अनिष तांबे, गटप्रमुख अदिल मिठागरी, अनिकेत तांबे, अतिष तांबे, आकाश मोरे, जयेश बेनकर, प्रतीक तांबे, गणेश मोरे इत्यादी शिवसैनिक युवासैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पूरग्रस्तांना अनेक संस्थांकडून, दानशूर व्यक्तींकडून मदत देण्यात आली आहे. मात्र ती पुरेशी नसल्याने अजूनही लोक मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. पूरग्रस्त कुटुंबांनाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करता यावा यासाठी प्राधान्याने ही मदत देण्यात आली.

Web Title: Assistance from Yuvasena, Shiledar Pratishthan of Swarajya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app