देवगड समुद्रकिनार्‍यावर डांबरसदृश थर

By Admin | Updated: May 28, 2014 01:32 IST2014-05-28T01:28:40+5:302014-05-28T01:32:00+5:30

भरतीच्या लाटांबरोबर काळसर चिकट द्रवाचा थर

Asparagus layer on Devagad beach | देवगड समुद्रकिनार्‍यावर डांबरसदृश थर

देवगड समुद्रकिनार्‍यावर डांबरसदृश थर

देवगड : गेले दोन दिवस देवगड समुद्र किनार्‍यावर भरतीच्या लाटांबरोबर काळसर चिकट द्रवाचा थर समुद्र किनार्‍यावर येत आहे. काळ्या रंगाच्या चिकटसर द्रवामुळे समुद्रकिनार्‍यावरील सोनेरी वाळू काळी बनली आहे. हा डांबरसदृश चिकट द्रव कसला आहे, याचा अजून उलगडा झालेला नाही. या द्रवामुळे समुद्रकिनारा दूषित झाला असून पर्यटकांनी किनार्‍याकडे पाठ वळविली आहे. वैशाख अमावास्येची मोठी भरती व ओहोटी याबरोबर हा टाकाऊ पदार्थ किनार्‍याकडे फेकला गेला आहे. मच्छिमारी बोटी खोल समुद्रात मासेमारी करताना कित्येकवेळा टाकाऊ पदार्थ व डांबरसदृश वंगण समुद्रात सोडतात. ते खडकांना तळाशी जाऊन चिकटून राहते. मात्र, प्रवाह बदलल्यामुळे किंवा तापमानातील फरकामुळे हे खडकांपासून वेगळे होते व प्रवाहाच्या जोराबरोबर समुद्रकिनारी येऊन थडकते. प्रत्यक्ष जवळून बघितल्यावर हा चिकट थर डांबरसदृश दिसतो. (प्रतिनिधी)

Web Title: Asparagus layer on Devagad beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.