शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: वाशी बाजारात नऊ हजार पेट्या आंबा, यावर्षीची सर्वाधिक आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:30 IST

रत्नागिरी : निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या हापूसला यंदा मुंबईची वाट दिसणार की नाही, असा प्रश्न होता. मात्र, मंगळवारी, दि. ४ ...

रत्नागिरी : निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या हापूसला यंदा मुंबईची वाट दिसणार की नाही, असा प्रश्न होता. मात्र, मंगळवारी, दि. ४ मार्च रोजी हापूसच्या तब्बल ९ हजार पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्या आहेत. यंदाच्या हंगामात मुबलक प्रमाणात आंबाबाजारात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे यावर्षी हापूसचे प्रमाण खूप कमी आहे. गतवर्षीच्या हंगामात या दिवसांत ३५ ते ४० हजार पेटी आंबा विक्रीला येत होता. यावर्षी आंबा उत्पादन अत्यल्प असल्यामुळे बाजारात पेट्या विक्रीला पाठवण्याचे प्रमाण कमी आहे. मंगळवारी वाशी बाजारपेठेत दिवसभरात एकूण ९ हजार १४१ आंबा पेट्या विक्रीला आल्या. त्यापैकी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ४,५६६ तर अन्य राज्यांतून ४,५७५ आंबा पेट्या आल्या होत्या.दरवर्षी नैसर्गिक संकटामुळे आंबा उत्पादन धोक्यात येत आहे. यंदाही तीच स्थिती आहे. उत्पादनाची अशी स्थिती असताना यावर्षी प्रथमच ९ हजार पेट्या एकाच वेळी विक्रीला गेल्या आहेत. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गातून आंबा बाजारात पाठवण्यात येत असला तरी सर्वाधिक आंबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. सध्या पेटीला ३५०० ते ९००० रुपये दर मिळत आहे. गतवर्षी याच दिवसात ४० हजार पेट्या विक्रीला होत्या. शिवाय दर १५०० ते ४००० रुपये होता.

वीस दिवसांचा हंगामदि. १५ मार्चनंतर बाजार समितीतील आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. दि. १० ते ३० एप्रिल या दिवसांत आंबा बाजारात मुबलक असेल. त्यानंतर पुन्हा घसरण होणार आहे. मेमध्ये आंब्याचे प्रमाण किरकोळ असेल, असे बागायतदार सांगत आहेत.

अन्य राज्यांतील आंबाकेरळ, कर्नाटक व आंध्रप्रदेश येथून हापूस, बदामी, लालबाग आंबा विक्रीला येत आहे. कर्नाटक हापूस २५० ते ४०० रुपये किलो, बदामी १०० ते १५० रुपये, तर लालबाग ९० ते १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाMarketबाजार