चिमुकल्या शास्त्रज्ञांचे कलाविश्व उलगडणार!

By Admin | Updated: January 13, 2015 00:10 IST2015-01-12T23:35:51+5:302015-01-13T00:10:28+5:30

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन : आंबवच्या माने महाविद्यालयात अवतरणार विज्ञान युग

The art world of Chinese scientists will unveil! | चिमुकल्या शास्त्रज्ञांचे कलाविश्व उलगडणार!

चिमुकल्या शास्त्रज्ञांचे कलाविश्व उलगडणार!

रत्नागिरी : ‘चिरंतन विश्वासाठी गणित, विज्ञान’ ही थीम घेऊन १७ ते २१ जानेवारी या कालावधीत आंबव येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार आहे. १९८३ साली रा. भा. शिर्के प्रशालेत विज्ञान प्रदर्शन झाले होते. तद्नंतर सुमारे ३२ वर्षांनंतर रत्नागिरी जिल्ह्याला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे यजमानपद भुषवण्याचा मान मिळाला आहे.
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाची जय्यत तयारी आंबव येथील राजेंद्र माने महाविद्यालयात सुरु आहे. शालेय विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, राज्य विज्ञान संस्था, नागपूर व राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव यांच्या संयुक्त विद्यमाने आंबव येथे १७ ते २१ अखेर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रदर्शन होणार आहे. राज्यभरातून सुमारे ३६ जिल्हे प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. एकूण ४२६ विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
राज्यभरातील प्राथमिक विभागाकडून १२३, माध्यमिक विभागातील १२३, शैक्षणिक साहित्य प्रतिकृ ती, प्राथमिक विभागाच्या ३६, माध्यमिक विभागाच्या ३६, लोकसंख्या शिक्षण संबंधी शिक्षकांच्या प्रतिकृती मांडण्यात येणार आहेत. या विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक व प्राथमिक विभागांच्या प्रत्येकी ३६ प्रतिकृ ती सादर केल्या जाणार आहेत.
याशिवाय प्रयोगशाळा परिचरांच्या ३६ वैज्ञानिक प्रतिकृती मिळून एकूण ४२६ विज्ञान प्रतिकृ ती सादर केल्या जाणार आहेत. राज्यभरातील ३६ जिल्हे या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवणार असून, २४६ विद्यार्थी, २४६ शिक्षक, १८० प्रतिकृ ती सादर करणारे शिक्षक तसेच विज्ञान पर्यवेक्षक, अधिकारी मिळून सुमारे १००० ते १२०० लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
राज्यस्तरीय विज्ञान शिबिर असल्यामुळे जिल्ह्यातील विविध शाळा, विद्यार्थी तसेच नागरिकांना वैज्ञानिक प्रतिकृती पाहता याव्यात, याकरिता प्रत्येक तालुक्यातून खास एस. टी. बसेसची सुविधा करण्यात आली आहे.
एस. टी. प्रशासनाने मागणीप्रमाणे गाड्या सोडण्याचे आश्वासन दिले आहे. दापोली, मंडणगड व रत्नागिरी तालुक्यासाठी १८ रोजी, खेड, राजापूर, लांजा तालुक्यासाठी १९ रोजी, चिपळूण, गुहागर तालुक्यातून २० रोजी, तर संगमेश्वर तालुक्यातून सलग चारही दिवस एस. टी.च्या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन ३२ वर्षांनंतर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच होत असल्याने माने महाविद्यालयाच्या परिसरात विज्ञानमय वातावरण झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The art world of Chinese scientists will unveil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.