शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत आर्ट सर्कलतर्फे जानेवारीत कला संगीत महोत्सव, विविध क्षेत्रातील प्रतिभावंत कलाकारांना ऐकण्याची-पाहण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 13:34 IST

रत्नागिरीतील आर्ट सर्कलच्या ११व्या कला संगीत महोत्सवाची थिबा पॅलेस येथे पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. दिनांक २६ ते २८ जानेवारी या कालावधीत रंगणाऱ्या महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंत कलाकारांना ऐकण्याची आणि पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

ठळक मुद्देमहोत्सवाची सुरुवात शमिका भिडे, स्वरांगी मराठे यांच्या युगल गायनाने २६ ते २८ जानेवारी या कालावधीत रंगणाऱ महोत्सवमहोत्सवाची सांगता डॉ. प्रभा अत्रे यांच्या शास्त्रीय गायनाने विविध क्षेत्रातील प्रतिभावंत कलाकारांना ऐकण्याची, पाहण्याची संधी

रत्नागिरी : रत्नागिरीतील आर्ट सर्कलच्या ११व्या कला संगीत महोत्सवाची थिबा पॅलेस येथे पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. दिनांक २६ ते २८ जानेवारी या कालावधीत रंगणाऱ्या कला संगीत महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंत कलाकारांना ऐकण्याची आणि पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.यावर्षीच्या महोत्सवाची सुरुवात नव्या दमाच्या प्रसिद्ध गायिकाद्वयी शमिका भिडे आणि स्वरांगी मराठे यांच्या युगल गायनाने होईल. त्यानंतर शंकरराव टेंगशे स्मृती मैफिलीमध्ये पं. उदय भवाळकर यांच्या धृपद गायनाचा कार्यक्रम रंगणार आहे.

या दिवशीच्या कार्यक्रमाची सांगता सारंगी व जोरी यांच्या जुगलबंदीने होणार असून, प्रसिद्ध सारंगिये संगीत मिश्रा आणि तबलावादक सुखविंदर सिंग नामधारी आपली कला सादर करतील. जोरी हे तबल्याचे मूळ स्वरूप असून, त्याला पंजाबी पखवाज असेही म्हटले जाते. कै. शंकरराव टेंगशे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस सर्व रसिकांसाठी विनामूल्य राहील.महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि. २७ जानेवारी रोजी सरोद वादनाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. प्रसिद्ध सरोदवादक पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार सरोद वादन सादर करणार असून, सत्यजित तळवलकर त्यांना तबला साथ करतील.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विशाल कृष्ण आणि रागिणी महाराज यांचे कथ्थक नृत्य होईल. विशाल कृष्ण हे बनारस घराण्याचे नर्तक असून, ते प्रसिद्ध नर्तिका सितारा देवी यांचे नातू आणि पं. गोपी कृष्ण यांचे पुतणे आहेत. रागिणी महाराज या प्रसिद्ध कथ्थक नर्तक पं. बिरजू महाराज यांची नात व शिष्या आहेत.महोत्सवाचा तिसरा दिवस सतारवादन आणि शास्त्रीय गायनाने रंगणार असून, पं. पूर्बायन चॅटर्जी यांचे सतारवादन आणि प्रसिद्ध गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

महोत्सवाची सांगता डॉ. प्रभा अत्रे यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. डॉ. अत्रे या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका असून, विदुषी, शिक्षणतज्ज्ञ, लेखिका, संशोधिका आणि गुरु असा त्यांचा लौकिक आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीThiba Palaceथिबा पॅलेस