संगीत व्यवसाय गेला प्रायोजकांच्या हाती, ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 05:23 AM2017-09-18T05:23:25+5:302017-09-18T05:23:28+5:30

In the hands of the sponsors of the music business, veteran singer Dr. Prabha Atre's dignity | संगीत व्यवसाय गेला प्रायोजकांच्या हाती, ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांची खंत

संगीत व्यवसाय गेला प्रायोजकांच्या हाती, ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांची खंत

Next

पुणे : संगीत हे मनोरंजनाचे साधन नाही, तर ती ज्ञानशाखा आहे. संगीताचा व्यवसाय करणा-या बहुतेकांना केवळ मंचप्रदर्शन करायचे असते. आजचा संगीत व्यवसाय प्रायोजकांच्या हातात गेला आहे, अशी खंत किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी येथे व्यक्त केली.
ग्वाल्हेर घराण्याचे विख्यात गायक पं. डॉ. विकास कशाळकर यांना रविवारी स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने गौैरवण्यात आले. गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. अत्रे बोलत होत्या. या वेळी गानवर्धन संस्थेचे संस्थापक कृ. गो. धर्माधिकारी, कार्याध्यक्ष प्रसाद भडसावळे, नातू फाऊंडेशनचे शारंग नातू, ज्येष्ठ पत्रकार आणि संगीत अभ्यासक मुकूंद संगोराम आदी उपस्थित होते.
‘आपल्या गाण्यावर कोणाच्या गाण्याचा प्रभाव पडू द्यायचा, हे कलाकाराने ठरवायचे असते. मी आजवर प्रभातार्इंच्या मार्गावर मार्गक्रमण करत आलो.

Web Title: In the hands of the sponsors of the music business, veteran singer Dr. Prabha Atre's dignity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.