शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७८ कोटी २६ लाखाची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 12:52 IST

mahavitran, ratnagirinews, bill वीजबिल वसुलीमध्ये अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६७ हजार ७०३ ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे जिल्ह्यात सध्या ७८ कोटी २६ लाख ९६ हजार रुपये थकबाकी आहे. कोरोना कालावधीत अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या महावितरणपुढे कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ७८ कोटी २६ लाखाची थकबाकीथकबाकी वसुलीसाठी महावितरणपुढे मोठे आव्हान

मेहरून नाकाडेरत्नागिरी : वीजबिल वसुलीमध्ये अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६७ हजार ७०३ ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे जिल्ह्यात सध्या ७८ कोटी २६ लाख ९६ हजार रुपये थकबाकी आहे. कोरोना कालावधीत अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या महावितरणपुढे कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी घरगुती ग्राहकांची आहे. एक लाख ३९ हजार ९५९ ग्राहकांकडे ४० कोटी ८८ लाख ७१ हजार रुपयांची थकबाकी आहे. एप्रिलपासून काही ग्राहकांनी वीजबिले न भरल्यामुळे थकबाकीची रक्कम वाढली आहे. त्यापाठोपाठ वाणिज्यिकच्या १७ हजार ५०४ ग्राहकांकडे १५ कोटी २९ लाख १८ हजार रुपयांची थकबाकी आहे. महावितरणकडून वेळोवेळी आवाहन करूनही ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद लाभत नसल्याने थकबाकीचे आकडे वाढले आहेत.थकीत वीजबिल भरण्याचे शासन आदेश आल्याने ग्राहकांना प्रत्यक्ष भेटून वीजबिल भरण्याची विनवणी करण्यात येणार आहे. थकबाकीची रक्कम एकाचवेळी भरणे ग्राहकांना अशक्य असल्याने सात हप्त्यांमध्ये भरण्याची ग्राहकांना सवलत महावितरणतर्फे दिली जाणार आहे. निव्वळ खासगी ग्राहकांचे नाही तर सरकारी बिलांची थकबाकीही वाढली असल्याने वसुलीचे फार मोठे आव्हान महावितरणपुढे उभे राहिले आहे. वाढीव बिलांबाबत लोकांमध्ये तीव्र नाराजी असल्याने थकबाकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेही वसुलीचे प्रमाण वाढत चालले आहे.

सहकार्य करावेकोरोना व ह्यनिसर्गह्ण चक्रीवादळ काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अखंडित वीजपुरवठा ठेवला होता. ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे.- देवेंद्र सायनेकर,प्रभारी मुख्य अभियंता, महावितरण

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरीbillबिल