शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३ हजार ४०० विद्यार्थ्यांनी घातले १ लाख सूर्यनमस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 11:55 IST

सूर्यनमस्कार हे सर्वांगासन असून, दिवसाला ठराविक सूर्यनमस्कार घातल्यास प्रकृतीस्वास्थ उत्तम राहते. सूर्यनमस्काराचे महत्व पटवून देण्यासाठी दरवर्षी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर तब्बल ३ हजार ४०० विद्यार्थ्यांनी १ लाख सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प पूर्ण केला.

ठळक मुद्देतब्बल ३ हजार ४०० विद्यार्थ्यांनी घातले १ लाख सूर्यनमस्काररत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे उपक्रम

रत्नागिरी : सूर्यनमस्कार हे सर्वांगासन असून, दिवसाला ठराविक सूर्यनमस्कार घातल्यास प्रकृतीस्वास्थ उत्तम राहते. सूर्यनमस्काराचे महत्व पटवून देण्यासाठी दरवर्षी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर तब्बल ३ हजार ४०० विद्यार्थ्यांनी १ लाख सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प पूर्ण केला.जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. गतवर्षी या उपक्रमात ४ हजार विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते. या सर्वांनी मिळून १ लाख ३४ हजार सूर्यनमस्कार घातले होते. त्यामुळे यंदा यापेक्षा जास्त सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प सोसायटीतर्फे करण्यात आला होता.रत्नागिरीतील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर पहाटे ५.३० वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात केली. यामध्ये पालकांचाही समावेश होता. यावेळी सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, बापू गवाणकर, विश्वनाथ बापट, रमा जोग यांच्यासह शाळांचे शिक्षक, पालक उपस्थित होते.विद्यार्थ्यांचे गट करून त्यांच्याकडून तालबद्ध सूर्यनमस्कार घालून घेण्यात येत होते. या उपक्रमात जी. जी. पी. एस्., शिर्के हायस्कूल, जांभेकर विद्यालय, केळ्ये हायस्कूल, अभ्यंकर कुलकर्णी ज्युनिअर कॉलेज, लॉ कॉलेज, फाटक हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, देसाई हायस्कूल, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृहमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी शिल्पा पटवर्धन यांनी बोलताना सांगितले की, उत्तम जीवन जगण्यासाठी मनाचे आरोग्य, बुद्धीचे आरोग्य आणि देहाचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. सूर्यनमस्कार हा तीन आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करते. सूर्यनमस्काराने माणसाचा रजोगुण कमी होतो. विद्यार्थ्यांसह देशाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.प्राचार्य किशोर सुखटणकर म्हणाले की, विद्यार्थ्यांची मानसिक व शारीरिक क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी सूर्यनमस्कार महत्वाचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असून, सूर्यनमस्काराचा संकल्प दरवर्षी राबवण्यात यावा, असे सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यRatnagiriरत्नागिरी