तहसीलदारांकडून कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST2021-06-29T04:21:52+5:302021-06-29T04:21:52+5:30

चिपळूण : लोकसहभागातून मुंढे गावाने एक लाखाची मदत करत देखणा विलगीकरण कक्ष उभा केला, त्याबद्दल गावकऱ्यांच्या एकजुटीचे दर्शन गावात ...

Appreciation from Tehsildar | तहसीलदारांकडून कौतुक

तहसीलदारांकडून कौतुक

चिपळूण : लोकसहभागातून मुंढे गावाने एक लाखाची मदत करत देखणा विलगीकरण कक्ष उभा केला, त्याबद्दल गावकऱ्यांच्या एकजुटीचे दर्शन गावात घडत असून त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे, असे गौरवोद्गार तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी काढले.

रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील माखजन-करजुवे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यातून प्रवास करताना प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा, अन्यथा खड्ड्यांमध्येच वृक्षारोपण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

समितीला मुदतवाढ

रत्नागिरी : मागासवर्गीयांची पदोन्नती, सरळ सेवेमध्ये प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करून त्यांचे शासकीय सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला अहवाल सादर करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

रोपांचे वाटप करणार

रत्नागिरी : राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला आहे, त्यांना सामाजिक वनीकरण विभागातर्फे दि. १ जुलै रोजी १० रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. या विभागाच्या वनसमृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे.

महिनाभरापासून गढूळ पाणी

रत्नागिरी नगर परिषदेचे साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित झाले आहे. तरीही माळनाकापासून शहराच्या खालच्या भागातील पाणीपुरवठा गढूळच होत आहे. थोडा जरी पाऊस पडला तरी नळांना गढूळ पाणी येत असल्याने खालच्या भागातील रहिवाशी हैराण झाले आहेत.

वैद्यकीय साहित्याची मदत

चिपळूण : दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्था, आकले संचलित न्यू इंग्लिश स्कूल तिवरे, ता. चिपळूण या विद्यालयास श्रीरामवरदायिनी हेल्थ फाउंडेशन मुंबई व श्रीव्याघ्रांबरीदेवी तिवरे ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड तपासणी प्राथमिक साहित्य देण्यात आले.

Web Title: Appreciation from Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.