तुरळचे शंकर हरेकर यांची बैलजोडी प्रथम
By Admin | Updated: July 19, 2016 21:25 IST2016-07-19T21:25:56+5:302016-07-19T21:25:56+5:30
आरवलीत रंगली स्पर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस - शेखर निकम युवा मंचातर्फे सामूहिक नांगरणी स्पर्धा

तुरळचे शंकर हरेकर यांची बैलजोडी प्रथम
तुरळचे शंकर हरेकर यांची बैलजोडी प्रथम
आरवलीत रंगली स्पर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस - शेखर निकम युवा मंचातर्फे सामूहिक नांगरणी स्पर्धा
आरवली : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शेखर निकम युवा मंच, सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक नांगरणी व भात लावणी स्पर्धेत तुरळच्या शंकर हरेकर (३७) यांची खिल्लारी बैलजोडी विजयी झाली. या बैलजोडीला १० हजार रुपये रोख व चषक देऊन आमदार संजय कदम यांच्याहस्ते गौरवण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, गटनेते अजय बिरवटकर, सुरेश भायजे, राजेंद्र सुर्वे, जयंद्रथ खताते, तात्या गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
सामूहिक नांगरणी व भात लावणी स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी स्वत: नांगर धरुन केले. स्पर्धेत ४५ बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या नेतृत्त्वाखाली आरवली येथील ग्रामदैवत केदारनाथ मंदिराशेजारी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नांगरणी बैलजोडी स्पर्धेत धुवाधार पावसात ही स्पर्धा रंगली. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. घाटी बैलजोडी नांगरणी स्पर्धेत प्रथम शंकर हरेकर (तुरळ - ३७ सेकंद), द्वितीय मिलिंद कदम (वडेरू - ४६ सेकंद), तृतीय वैभव कदम (मुरडव - ४८ सेकंद) यांनी अनुक्रमे यश मिळवले. त्यांना अनुक्रमे १० हजार व चषक, ७ हजार, ४ हजार देऊन गौरविण्यात आले. गावठी बैलजोडी प्रकारात प्रथम अक्षय कातकर (वडेरू - ४१ सेकंद), द्वितीय दिलीप आग्रे (खेरशेत - ४६ सेकंद), तृतीय अमोल गुरव (आरवली - ४९ सेकंद) यांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार व एक हजार रुपये रोख व चषक देण्यात आले. सहभागी प्रत्येक जोडीला ५०० रुपये रोख, आंब्याचे कलम व राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने छत्र्यांचे वाटप करण्यात आले. नाना कांगणे, नितीन गुरव, कुलदीप भागवत, प्रशांत गुरव, योगेश गुरव यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्वप्नील गुरव यांनी स्पर्धेसाठी परिश्रम घेतले. (वार्ताहर)