शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 13:18 IST

भास्कर जाधव यांनी आज सोमवारी आपल्या समर्थकांची एक बैठक चिपळूणमध्ये घेतली.

चिपळूण : आपल्या समर्थकांसह आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत १३ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केली. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार असून, त्यातील भास्कर जाधव यांचा शिवसेनाप्रवेश निश्चित झाल्याने हा राष्ट्रवादीला खूप मोठा धक्का ठरणार आहे.

भास्कर जाधव यांनी आज सोमवारी आपल्या समर्थकांची एक बैठक चिपळूणमध्ये घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना प्रवेशासाठी १३ सप्टेंबरचा मुहूर्त काढल्याचे सांगितले. उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपण शिवसेनेत प्रवेश करू. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यावर आपला राग नाही आणि आपण त्यांच्याविरोधात काही बोलणार नाही. जर उध्दव ठाकरे यांनी संधी दिली तर गुहागर मतदार संघातून निवडणूक लढवू, असेही ते म्हणाले.

गुहागर आणि चिपळूणमधील राष्ट्रवादीचे काही पंचायत समिती सदस्य, गुहागर तालुक्यातील ७३ सरपंच आपल्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.गत निवडणुकीत तेव्हाचे राष्ट्रवादीचे आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या निवडणुकीत भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना