चिपळूण खरेदी विक्री संघाची वार्षिक सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST2021-03-31T04:31:47+5:302021-03-31T04:31:47+5:30
अडरे : चिपळूण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. ही सभा चेअरमन अशोक कदम यांच्या अध्यक्षतेखाली ...

चिपळूण खरेदी विक्री संघाची वार्षिक सभा खेळीमेळीत
अडरे : चिपळूण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. ही सभा चेअरमन अशोक कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तानाजी चोरगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. संघाच्या संचालक मंडळ सभेमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेला ३१ मार्च २०२० अखेरचा ताळेबंद व दिनांक १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीच्या नफा-तोटा पत्रकाला कार्योत्तर मान्यता देण्यात आली. यावेळी भिले सोसायटी चेअरमन रवींद्र तटकरे, ताम्हणमळाच्या माधुरी गोखले, कळवंडेचे नारायण उदेग, राहुल कदम, असुर्डेतील गणपत खापरे, कात्रोळीतील अनंत निवळकर, रिक्टोलीचे चंद्रकांत आदवडे, शिरगावचे श्रीधर शिंदे, कळकवणेचे सुरेश शिंदे, नंदकुमार दूध उत्पादक संघाचे किसन माटे यांचा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तानाजीराव चोरगे व संघाचे चेअरमन अशोक कदम यांच्यासह संचालक मंडळाच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. चोरगे यांनी नवे कोणते उपक्रम राबवले पाहिजेत, याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी उपाध्यक्ष अजित कोकाटे, संचालक किसन महाडिक, पांडुरंग माळी, चंद्रकांत चव्हाण, विजय शिर्के, दिलीप माटे, सदाशिव चव्हाण, तुकाराम बंगाल, संजीवकुमार गुजर, दिनेश माटे, कृष्णा खांबे, दिलीप चिपळूणकर, शिवाजी चिले, संचालिका स्मिता चव्हाण, व्यवस्थापक पांडुरंग कांबळे आदी उपस्थित होते.