जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: November 25, 2015 00:37 IST2015-11-25T00:22:32+5:302015-11-25T00:37:23+5:30
८९ ग्रामपंचायतींमध्ये रंगणार पोटनिवडणुका

जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
रत्नागिरी : राज्य निवडणूक आयोगाने २१ नोव्हेंबरच्या आदेशाने जानेवारी ते एप्रिल २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ४८ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक व विविध कारणांमुळे रिक्त असलेल्या ८९ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
तहसीलदारांनी नमुना ‘अ’मधील निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक २७ नोव्हेंबर आहे. दिनांक ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत नामनिर्देनपत्र सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर रोजी सकाळी ११पासून होईल. दि. ८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. १९ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल.
मतमोजणी २१ डिसेंबर रोजी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. मंडणगड तालुक्यात घराडी, निगडी येथे सार्वत्रिक निवडणूक, तर पडवे, पाट, मुरादपूर, कादवण, उमरोली, तोंडली, चिंचघर येथे पोटनिवडणूक होणार आहे. दापोली तालुक्यात नवसे, इनामपांगरी, फणसू, गावतळे येथे सार्वत्रिक, तर नवानगर येथे पोटनिवडणूक होणार आहे.
खेड तालुक्यात सुसेरी, वडगाव, आस्तान, असगणी, देवघर, तळघर, नांदगाव येथे सार्वत्रिक, तर कळंबणी खुर्द, हुंबरी, नांदिवली, शिरगाव, सात्वीणगांव, तळवटपाल, वावेतर्फ खेड, पोसरे बुद्रुक, धामणंद, सापिर्ली, चिरणी, जामगे, कुडोशी, तुंबाड, कासाई, कावळे, कर्टेल, खोपी, रजवेल, चौगुले मोहल्ला, घेरापालगड, पन्हाळजे येथे पोटनिवडणूक होईल.
चिपळूण तालुक्यात पोफळी येथे सार्वत्रिक, तर डेरवण, ढाकमोळी, गोंधळे, कालुस्ते बु. कालुस्ते खुर्द, नारदखेरकी, देवखेरकी, डुगवे, खांडोत्री, गाणे, दुर्गवाडी, कुडप, खोपड, पिलवली तर्फ वेळंब, निर्व्हाळ, रावळगाव, कळमुंडी, कोकरे, कौंढरताम्हाणे, तनाळी, निरबाडे, वडेरू, वीर, ढोक्रवली येथे पोटनिवडणूक होणार आहे. गुहागर तालुक्यात अंजनवेल, चिंद्रावळे, वेळंब, वेलदूर येथे सार्वत्रिक, तर खोडदे, पालशेत, काजुर्ली, विसापूर, आवरे असोरे, कोळवली, आंबेरे खुर्द, पाचेरी आगर, शिवणे, गोळेवाडी, उमराठ, भातगाव येथे पोटनिवडणूक होणार आहे.
संगमेश्रवर तालुक्यात असुर्डे, कोंडअसुर्डे, आंबेडबुद्रुक येथे सार्वत्रिक, तर डावखोल, घोडवली, पांगरी, गोळवली, मासरंग, धामणी, मेढेतर्फ फुणगूस, देवळे, पांचाबे, कोंडीवरे, निवे खुर्द, कासे येथे पोटनिवडणूक होणार आहे.
रत्नागिरी तालुक्यात फणसोप, शिरगाव, पोमेडी बुद्रुक येथे सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. लांजा तालुक्यात व्हेळ, कोचरी, कोर्ले, गोविळ, प्रभानवल्ली, रिंगणे, वेरवली बुद्रुक, देवधे, कोलधे, झापडे, कोंड्ये, गवाणे, उपळे, शिरवली, हर्चे येथे सार्वत्रिक, तर कोल्हेवाडी, वाघ्रट, साटवली, कोंडगे, कुरचुंब, वाघणगाव, कुर्णे, सालपे, इसवली पनोरे येथे पोटनिवडणूक होणार आहे. राजापूर तालुक्यात मोगरे, वडदहसोळ, राजवाडी, आंगले, देवाचे गोठणे, भालावली, केळवली, मूर, सागवे येथे सार्वत्रिक, तर शीळ, डोंगर, चुनाकोळवण, उपळे येथे पोटनिवडणूक होणार आहे. (प्रतिनिधी)