Ratnagiri: अंनिस कार्यकर्त्यांनी देवसडेत चक्क पाण्याने पेटवली होळी, त्यामागील विज्ञान केलं स्पष्ट 

By शोभना कांबळे | Published: March 27, 2024 01:50 PM2024-03-27T13:50:20+5:302024-03-27T13:51:18+5:30

चमत्कार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली

Annis activists lit Holi with water in Devasade, explained the science behind it | Ratnagiri: अंनिस कार्यकर्त्यांनी देवसडेत चक्क पाण्याने पेटवली होळी, त्यामागील विज्ञान केलं स्पष्ट 

Ratnagiri: अंनिस कार्यकर्त्यांनी देवसडेत चक्क पाण्याने पेटवली होळी, त्यामागील विज्ञान केलं स्पष्ट 

रत्नागिरी : समाजातील अंधश्रद्धा दूर करायच्या असतील, तर आपल्याला लोकांमध्ये जावे लागेल. लोकांना चमत्कारामागे विज्ञान असते किंवा त्या व्यक्तीची हातचलाखी असते, हे पटवून द्यावे लागेल. याच उद्देशाने खेड तालुक्यातील देवसडे गावामध्ये होळीच्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदीप गोवळकर यांनी देवसडे गावची होळी पाण्याने पेटवून त्यामागचे विज्ञान स्पष्ट केले.

कोकणात शिमगाेत्सव खूप मोठा सण असून, या सणानिमित्ताने मुंबई, पुणे या ठिकाणचे सर्व लोक आपल्या मूळ गावी येतात. या सणाचे औचित्य साधून खेड तालुक्यातील देवसडे गावामध्ये मुंबई मंडळ व ग्रामस्थ मंडळाकडून सालाबादाप्रमाणे होळीच्या ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदीप गोवळकर यांनी देवसडे गावची होळी पाण्याने पेटवून त्यामागचे विज्ञान सांगितले. जगातील सर्व आगी या पाण्याने विझवल्या जातात. पाण्याने होळी पेटणार असल्याने हा चमत्कार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर यांनी भोंदूबाबा, भगत, मांत्रिक अशाच विज्ञानाचा वापर करून आजपर्यंत आपल्याला फसवत आले आहेत. आपण चिकित्सा करायला हवी. आपण विज्ञानाची साधने वापरायला शिकलो, पण वैज्ञानिक दृष्टिकोन वापरायला शिकलो नाही. आपल्या आजूबाजूला घडणारे चमत्कार हे वैज्ञानिक कसोटीवर तपासले पाहिजेत, असेही यावेळी सांगितले.

अंनिस खेड शाखेचे कार्याध्यक्ष सचिन शिर्के यांनी प्रबोधनात्मक गीत गाऊन व्यसनमुक्तीबाबत लोकांमध्ये प्रबोधन केले. यावेळी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड ग्रामीणचे खजिनदार व देवसडे गावचे ग्रामीण अध्यक्ष सुधीर वैराग, ग्रामीण सचिव संतोष कदम, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुनील कदम, सचिव रवींद्र शिगवण, ग्रामपंचायत सदस्य स्वाती वैराग, सल्लागार संजय कदम, मुंबई महिला मंडळ अध्यक्ष वैशाली कदम, ग्रामीण महिला अध्यक्ष निर्मला कदम यांचे मोलाचे योगदान लाभले.

Web Title: Annis activists lit Holi with water in Devasade, explained the science behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.