‘पिपिलिका मुक्तिधाम’ कादंबरीला अण्णा भाऊ साठे वाङ्मय पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:33 IST2021-09-03T04:33:04+5:302021-09-03T04:33:04+5:30
आबलोली : कविवर्य विजयकुमार मिठे सार्वजनिक वाचनालय पालखेड बंधारा (नाशिक) यांचे २०१९ या वर्षाचे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. ...

‘पिपिलिका मुक्तिधाम’ कादंबरीला अण्णा भाऊ साठे वाङ्मय पुरस्कार जाहीर
आबलोली : कविवर्य विजयकुमार मिठे सार्वजनिक वाचनालय पालखेड बंधारा (नाशिक) यांचे २०१९ या वर्षाचे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात कादंबरी या वाङ्मय प्रकारात खरे-ढेरे-भाेसले महाविद्यालयातील प्रा. डाॅ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘पिपिलिका मुक्तिधाम’ कादंबरीला साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार विजेत्यांची नावे वाचनालयाचे अध्यक्ष योगेश गायकवाड, उपाध्यक्ष सुनील जगताप आणि सरचिटणीस माधवराव जाधव यांनी जाहीर केली आहेत. याच नावाचा पुरस्कार यापूर्वी जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानने जाहीर केला आहे. या कादंबरीविषयी विविध माध्यमातून डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले, डाॅ. दिलीप धोंडगे, बाबाराव मुसळे, प्रा. साईनाथ पाचारणे, डाॅ. किसन पाटील, प्रा. डाॅ. आनंद पाटील, डाॅ. रामेश्वर सोळुंखे, दा. गो. काळे, धनाजी घोरपडे या ज्येष्ठ समीक्षकांनी दखल घेतली आहे.
--------------------------------------
मर्ढेकरांच्या ‘मुंगी’मुळे मराठी कवितेत जसा बदल झाला, असाच बदल ‘पिपिलिका मुक्तिधाम’ या कादंबरीमुळे मराठी कादंबरीत झाला. ही कादंबरी मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील विस्फोटक कादंबरी आहे.
- डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले, ज्येष्ठ साहित्यिक