कोविड योद्धे समाजासाठी देवदूत : महेश नाटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:18 IST2021-03-30T04:18:39+5:302021-03-30T04:18:39+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क आबलोली : कोरोना आपत्तीच्या काळात सर्व जनजीवन टाळेबंदीत असताना कोविड योद्ध्यांनी आपल्या कुटुंबाची व स्वतःची पर्वा ...

Angels for the Kovid Warrior Society: Mahesh Natekar | कोविड योद्धे समाजासाठी देवदूत : महेश नाटेकर

कोविड योद्धे समाजासाठी देवदूत : महेश नाटेकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

आबलोली : कोरोना आपत्तीच्या काळात सर्व जनजीवन टाळेबंदीत असताना कोविड योद्ध्यांनी आपल्या कुटुंबाची व स्वतःची पर्वा न करता कोरोना प्रतिबंध, जनजागृती, विलगीकरण आदी कामांमध्ये झोकून देऊन काम केले. त्यांचे योगदान सर्व समाजघटकांसाठी प्रेरणादायी असून, कोविड योद्धे हे समाजासाठी खऱ्या अर्थाने देवदूत आहेत, असे गौरवोद्गार प्राथमिक आरोग्य केंद्र, कोळवलीचे रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांनी काढले.

प्राथमिक आरोग्य केंद्र, कोळवली (ता. गुहागर) यांच्यातर्फे कोरोना आपत्तीच्या काळात योगदान देणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, माध्यम प्रतिनिधी यांना कोविड योद्धा सन्मानाने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉ. घन:श्‍याम जांगिड यांनी केले. यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. एल. चरके, आरोग्य विस्तार अधिकारी के. पी. सातपुते, रुग्ण कल्याण समिती सदस्य अनंत मोहिते, रवींद्र गावडे, उपसरपंच अजित भुवड, पत्रकार अमोल पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. घन:श्‍याम जांगिड, डॉ. सतीश तांबे उपस्थित होते. आपल्या कार्याची दखल घेऊन आरोग्य केंद्राने आपला सन्मान केला. याबद्दल सत्कार मूर्तींनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर पुरोहित यांनी केले. संतोष पालशेतकर यांनी आभार मानले.

Web Title: Angels for the Kovid Warrior Society: Mahesh Natekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.