शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत साकारतंय ‘इनडोअर’ क्रीडा संकुल, २३ कोटी रुपये खर्च करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 18:51 IST

रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी भागात जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाने पुन्हा वेग घेतला आहे. तब्बल २३ काेटी रुपये खर्चून हे ...

रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी भागात जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाने पुन्हा वेग घेतला आहे. तब्बल २३ काेटी रुपये खर्चून हे क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. या ठिकाणी खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉलसारख्या मैदानी खेळांसाठी इनडोअर क्रीडांगण उभारले जात आहे. त्याचबरोबर १०० खोल्यांचे वसतिगृह उभारण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी रत्नागिरीत येणाऱ्या खेळाडू, शिक्षक यांच्या निवासाचा प्रश्नही कायमस्वरूपी सुटणार आहे.रत्नागिरीतील एमआयडीसीमध्ये सर्व सोयीसुविधांनीयुक्त जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पंधरा वर्षांपूर्वी आघाडीच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कालावधीत संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर बराच काळ निधीची तरतूद न झाल्यामुळे काम रखडले; परंतु उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा क्रीडा संकुलासाठी मागील वर्षी पाठपुरावा केला. क्रीडामंत्र्यांकडे झालेल्या बैठकांमुळे २९ कोटींची तरतूद करण्यात आली. त्यामधून सर्व सोयीसुविधांनीयुक्त जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.एमआयडीसी येथे ११.५० एकर जागेत हे संकुल उभारण्यात येत आहे. जिल्हा संकुलासाठी २९ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यातील ७ कोटी मारुती मंदिर येथील संकुलावर खर्ची करण्यात आला. उर्वरित २३ कोटींमधून एमआयडीसी येथे संकुल उभारले जाणार आहे. तसेच मुला-मुलींना राहण्यासाठी ५०० बेडचे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. हे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • इनडाेअर क्रीडांगणासाठी ३.५० कोटी
  • इनडाेअर क्रीडांगण ५७ बाय ३२ मीटर
  • ४०० मीटरचा सिंथेटिक धावण्याचा मार्ग
  • ८ ते १० कोटी खर्च

जिल्हा क्रीडा संकुलात विविध खेळांची मैदाने उभारण्याचे कामे वेगाने हाती घेण्यात आली आहेत. यासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. या क्रीडा संकुलामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना सुसज्ज क्रीडांगण मिळणार आहे. - विजय शिंदे, प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी