तळवली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अमोल जड्याळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST2021-09-03T04:32:44+5:302021-09-03T04:32:44+5:30
असगाेली : गुहागर तालुक्यातील तळवली ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी गावचे प्रा. अमोल जड्याळ यांची ग्रामसभेत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात ...

तळवली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अमोल जड्याळ
असगाेली : गुहागर तालुक्यातील तळवली ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी गावचे प्रा. अमोल जड्याळ यांची ग्रामसभेत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
शासनाच्या सर्व अटींचे पालन करून सरपंच मयुरी शिगवण यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.
ग्रामपंचायतीची नवीन कार्यकारिणी झाल्यानंतरची ही पहिलीच ग्रामसभा होती. मात्र, ही पहिलीच ग्रामसभा दहीहंडी उत्सव असतानाही मोठ्या संख्येने पार पडली. यावेळी विविध विषयांवर व विकासकामांवर चर्चा झाली. तसेच या ग्रामसभेत विविध कमिट्याही पुनर्गठित करण्यात आल्या. महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रा. अमोल जड्याळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या ग्रामसभेसाठी सरपंच मयुरी शिगवण, उपसरपंच अनंत डावल, ग्रामपंचायत सदस्य संतोष जोशी, सुनील मते, सचिन कळंबाटे, मानसी पोफळे, सविता शिंदे, प्रतीक्षा जाधव, ग्रामसेवक श्बागुल, पोलीस पाटील विनोद पवार, कृषी सहाय्यक शेळके, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष उत्तम पवार यांच्यासह ग्रामस्थ व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.