राजापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी अमिता सुतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST2021-09-02T05:08:30+5:302021-09-02T05:08:30+5:30
राजापूर : राजापूर पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या पाचल गणाच्या सदस्य अमिता सुतार यांची बिनविरोध निवड ...

राजापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी अमिता सुतार
राजापूर : राजापूर पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या पाचल गणाच्या सदस्य अमिता सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आमदार राजन साळवी यांच्यासह सभापती करुणा कदम, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांनी नूतन उपसभापती सुतार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
बारा सदस्य संख्या असलेल्या या पंचायत समितीतील सत्ताधारी शिवसेनेने सर्व सदस्यांना सभापती आणि उपसभापती पदासाठी संधी देण्याचे निश्चित केले आहे. त्याप्रमाणे करुणा कदम यांची सभापतीपदी निवड झाल्यानंतर उन्नती वाघरे यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या या पदासाठी बुधवारी निवडणूक होऊन शिवसेनेच्या सदस्य सुतार यांची अपेक्षेप्रमाणे उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, शहरप्रमुख संजय पवार, उपतालुकाप्रमुख रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर, राजन कुवळेकर, विश्वनाथ लाड, उपजिल्हा युवा अधिकारी व विभागप्रमुख संतोष हातणकर, महिला शहर संघटक वीणा विचारे, विभागीय संघटक उमेश पराडकर, नरेश दुधवडकर, कमलाकर कदम, नरेश शेलार, वसंत जड्यार, अशोक सक्रे, सोनम बावकर, शरद लिंगायत, मावळत्या उपसभापती उन्नती वाघरे, अभिजीत तेली, सुभाष गुरव, प्रकाश गुरव, प्रशांत गावकर, प्रमिला कानडे, अश्विनी शिवणेकर, विशाखा लाड, नगरपालिकेतील विरोधी गटनेते विनय गुरव, उपविभागप्रमुख नंदू मिरगुले, प्रसाद मोहरकर, विनोद शेलार, बाळू हर्याण आदींसह उपस्थित शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी नूतन उपसभापती सुतार यांचे अभिनंदन केले.