प्रकल्प होवो अथवा न होवो रिफायनरीतर्फे राजापूरकरांसाठी रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:52+5:302021-05-25T04:35:52+5:30

राजापूर : तालुक्यात होऊ घातलेल्या रिफायनरीला प्रत्यक्षात किती लोकांचा विरोध आहे, हा प्रश्‍न वादातित असला तरी रत्नागिरी रिफायनरी कंपनी ...

Ambulance for Rajapurkar by refinery whether project or not | प्रकल्प होवो अथवा न होवो रिफायनरीतर्फे राजापूरकरांसाठी रुग्णवाहिका

प्रकल्प होवो अथवा न होवो रिफायनरीतर्फे राजापूरकरांसाठी रुग्णवाहिका

राजापूर : तालुक्यात होऊ घातलेल्या रिफायनरीला प्रत्यक्षात किती लोकांचा विरोध आहे, हा प्रश्‍न वादातित असला तरी रत्नागिरी रिफायनरी कंपनी मात्र प्रकल्प होवो अथवा न होवो काेराेनाच्या या कठीण काळात राजापूरकरांच्या मदतीला धावली आहे. सद्य:स्थितीत राजापूरकरांच्या मदतीसाठी रिफायनरीतर्फे एक सुसज्ज रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून दिली आहे़ राजापूरकरांनी मागणी केल्यास तत्काळ सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्याची तयारीही करण्यात आली आहे.

जिल्ह्यात काेराेनाची रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काेराेनाच्या जोडीला ताैउते वादळाने जनतेला आणि राज्य शासनाला आणखीनच संकटात टाकले आहे. तालुक्यात कोराेना महामारीने तब्बल ७८ मृत्यू झाले आहेत. सधन कुटुंबांतील कोरोनाबाधित रुग्ण प्रगत शहरात जाऊन उपचार करून घेत आहेत. मात्र, गोरगरीब रुग्णांना पर्यायच नसल्याने त्यांच्यासाठी अपुऱ्या वैद्यकीय सुविधा असलेली आरोग्य केंद्रे आपल्या परीने शर्थ करीत आहेत. मात्र, अद्यापही राजापुरात अत्याधुनिक कोविड रुग्णालय उभारण्यात आलेले नाही, ही शाेकांतिका आहे़

रिफायनरीच्या माध्यमातून रोजगाराच्या जोडीला प्रगत वैद्यकीय सुविधा, शिक्षण, दळणवळणाची साधने उपलब्ध होतील याची ग्वाही तब्बल तीन वर्षांपूर्वीच देण्यात आलेली होती. मात्र, राजापूरकर जनतेने याबाबत फारसे गांभीर्य न दाखवल्याने आज आरोग्यविषयक बाबींसाठी तालुक्यातील गोरगरीब जनतेला झगडावे लागत आहे. विशेष म्हणजे रिफायनरी विरोधाचा बागुलबुवा उभा करणारा एकही एनजीओ गेल्या दीड ते दोन वर्षांच्या या कठीण काळात तालुक्यात मदतीसाठी फिरकलेला नसून प्रकल्प विरोधकही सोशल डिस्टन्स पाळून असलेले दिसत आहेत. तालुक्यातील सुशिक्षित जनतेने रत्नागिरी रिफायनरी कंपनीकडे प्रगत कोविड रुग्णालयाची मागणी करून लोकांचे जीव वाचवावेत, असा सूर उमटत आहे.

ओम चैतन्य श्रीभानुदासाय स्त्री हितवर्धिनी या नोंदणीकृत संस्थेतर्फे राजापूरकरांना उपलब्ध करून दिलेल्या या सुसज्ज रुग्णवाहिकेचा संचलन खर्च रत्नागिरी रिफायनरीने उचलला आहे. या रुग्णवाहिकेची सेवा कोदवलीपासून गावखडी व धारतळे केंद्राच्या नाटे गावापर्यंतच्या पंचक्रोशीसाठी विनामूल्य उपलब्ध असेल.

----------------------------

रत्नागिरी रिफायनरी कंपनीने राजापूरकरांना माेफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे़

Web Title: Ambulance for Rajapurkar by refinery whether project or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.