रुग्णवाहिका उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST2021-06-18T04:22:56+5:302021-06-18T04:22:56+5:30
२. दापोली तालुक्यातील जालगाव येथील मंदिरात वार्षिक गोंधळाचा कार्यक्रम नुकताच कोरोनाचे नियम पाळून पार पडला. यावेळी कोरोनामुक्त जगाचे गाऱ्हाणे ...

रुग्णवाहिका उपलब्ध
२. दापोली तालुक्यातील जालगाव येथील मंदिरात वार्षिक गोंधळाचा कार्यक्रम नुकताच कोरोनाचे नियम पाळून पार पडला. यावेळी कोरोनामुक्त जगाचे गाऱ्हाणे श्री भैरी देवाला घालण्यात आले. यावेळी गावचे अध्यक्ष व मानकरी अशोक जालगावकर यांनी देवाला गाऱ्हाणे घालताना जगाला लवकरात लवकर कोरोनामुक्त कर, अशी साद घातली. यावेळी देवांची पूजा, गाऱ्हाणे, आरती, प्रसाद असे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर बाजारपेठेतील शिस्त बिघडली असून, गर्दी वाढू लागली आहे. कोरोना वाढत असताना काहीजण विनाकारण फिरत आहेत. त्यामुळे अशांना वचक बसविण्यासाठी नाटे पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त करताना विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कोरोना संकट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत जनतेने नियम आणि अटींचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नाटे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी केले आहे.