शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: आंबडवे-राजेवाडी राष्ट्रीय महामार्ग सात वर्षे रखडलेलाच, केंद्र शासनाच्या संसद ग्राम योजनेतून काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 17:56 IST

मंडणगड : केंद्र शासनाने संसद ग्राम योजनेमधून हाती घेतलेल्या आंबडवे - राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काम आठ वर्षांनंतर तरी पूर्ण ...

मंडणगड : केंद्र शासनाने संसद ग्राम योजनेमधून हाती घेतलेल्या आंबडवे - राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काम आठ वर्षांनंतर तरी पूर्ण होणार का, असा प्रश्न तालुकावासीयांना पडला प्रश्न आहे.२०१६ साली सुरू झालेल्या आंबडवे - लोणंद या राष्ट्रीय महामार्गावरील महाड येथील राजेवाडी ते आंबडवे या सुमारे साठ किमी अंतरात मार्गाचे नूतनीकरण रुंदीकरणाबरोबर काँक्रिटीकरण होत आहे. खूप विलंब होत असलेल्या या मार्गाचे काम सध्या चर्चेत आहे. या प्रकल्पाच्या नूतनीकरणामुळे आजूबाजूच्या परिसरात सुबत्ता निर्माण होईल यात शंका नाही. पर्यटनाबरोबर, दळणवळणासाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरेल. मात्र भविष्यकालीन वाढती रहदारी आणि लोकवस्ती, वाढते शहरीकरण लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणाने मार्गाचे काम गुणवत्तापूर्ण असणे गरजेचे आहे व त्यासाठी तालुकावासीय आग्रही आहेत.गेल्या सहा वर्षात हा प्रकल्प केंद्र शासनाच्या अखत्यारित असतानाही रखडलेला आहे. देशभरात रस्त्याची कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असताना मंडणगडच्या पदरी मात्र नेहमीप्रमाणे निराशा पडली आहे. काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची कालमर्यादा असताना आठ वर्षे झाली तरी रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या महामार्गामुळे निर्माण केलेल्या समस्यांना ग्रामस्थ आठ वर्षे सामोरे जात आहेत.मार्ग तयार होत असताना अनेक ठिकाणी सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नाही. रस्त्यामधील अनेक धोकादायक वळणे, चढ-उतार अनेक ठिकाणी तशीच ठेवण्यात आली आहेत. हा महामार्ग बनवताना भविष्याचा विचार करण्यात आला नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. रस्त्याच्या बाजूने उभी करण्यात आलेली गटारे भविष्यकाळात कळीचा मुद्दा ठरतील की काय, अशीही शंका निर्माण होते. यातील सांडपाण्याचा निचरा कोठे होणार आहे, याचे उत्तर मिळालेले नाही. काम सुरू असलेल्या लगतच्या अनेक गावातील परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

गाड्या उडतात हवेततुळशी येथे पावसात खचलेला काँक्रीट रस्ता अद्याप दुरुस्त न केल्याने गाड्या हवेत उडून जोरात आदळण्याचे प्रकार घडत आहेत. यात प्रवाशांना गंभीर मार बसत आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गCentral Governmentकेंद्र सरकार