साखरपा परिसरातील गणेशचित्र शाळांमध्ये लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST2021-08-21T04:36:04+5:302021-08-21T04:36:04+5:30
साखरपा : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरातील गणेशचित्रशाळांमध्ये लगबग वाढली आहे. मूर्तिकारांच्या मदतीला घरातील ...

साखरपा परिसरातील गणेशचित्र शाळांमध्ये लगबग
साखरपा : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरातील गणेशचित्रशाळांमध्ये लगबग वाढली आहे. मूर्तिकारांच्या मदतीला घरातील मंडळीही धावली असून, मूर्तींचे काम लवकर संपवून रंगकामाला सुरूवात करण्याच्या तयारीत अनेकजण आहेत.
साखरपा परिसरातील कोंडगाव येथील सतीश वेल्हाळ, सुरेश पांचाळ, भडकंबा येथील बाळू जामसंडेकर, पिंट्या पवार, विश्वनाथ कनावजे, साखरपा येथील योगेश जाधव, मुर्शी येथील राजाराम ढोके, वांझोळे येथील प्रकाश करंबळे, मोर्डे येथील बाळा गुरव यांच्या गणेश चित्रशाळांमध्ये गणेशमूर्तींच्या तयारीला वेग आला आहे. या कामात पुरुषांच्या बरोबरीने घरातील महिला, मुलेही हातभार लावत आहेत. देखणी, रेखीव मूर्ती तयार करण्याकडे सर्वच कारागिरांचा कटाक्ष असतो.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि महापुरामुळे झालेले नुकसान यामुळे यावर्षी अनेकजण गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणाऱ्यावर भर देण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अनेकांनी गणपतीच्या छाेट्या मूर्तीच पसंत केल्या आहेत. त्यातच महागाईमुळे रंग, माती, मजुरी वाढल्याने मूर्तींच्या किमतीही वाढविण्यात आल्या आहेत. त्याची झळ गणेशभक्तांना बसणार आहे.