शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

Satara Bus Accident : आंबेनळी दुर्घटना : काळाच्या काळ्या दिवसाला एक महिना पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:09 IST

जुलै महिन्यातील २८ तारखेला आंबेनळी घाटात दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसची दुर्घटना होऊन यामध्ये ३० कर्मचारी नजरेआड झाले. या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला असून, आंबेनळी घाटातील कटू आठवणीचा काळा दिवस आहे.

ठळक मुद्देआंबेनळी दुर्घटना : काळाच्या काळ्या दिवसाला एक महिना पूर्ण३० कर्मचारी जेव्हा नजरेआड होतात...मदतीचे हात मिळूनही आयुष्य काही सावरेना

दापोली : जुलै महिन्यातील २८ तारखेला आंबेनळी घाटात दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसची दुर्घटना होऊन यामध्ये ३० कर्मचारी नजरेआड झाले. या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला असून, आंबेनळी घाटातील कटू आठवणीचा काळा दिवस आहे.

या घटनेच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. दुर्घटनेनंतर अनेक ठिकाणांहून मदत झाली. शासन स्तरावरुनदेखील या घटनेची तत्काळ दखल घेतली गेली. मात्र, मदत मिळूनही कुटुंबाना दु:खाच्या दरीतून सावरण्याचे बळ मिळाले नाही.नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन हे सण हिंदू धर्मियांचे आनंदाचे सण. मात्र, अनेकांच्या घरी या सणाचा आनंद ओसरुन गेला. काही दिवसांवर दहीहंडी सण येत असून, २८ जुलैनंतर दापोली तालुक्यामध्ये या घटनेचे सावट सर्वच ठिकाणी दिसून आले. आंबेनळी घाटातील बस अपघात कसा घडला, याबाबत नेमके कारण आजही समजू शकले नाही. विद्यापीठातील मृत व्यक्तिंच्या कुटुंबियांकडून या घटनेची सखोल चौकशी व्हावी म्हणून शासन दरबारी मागणी जोर धरु लागली आहे.आंबेनळी घाटामध्ये मदतीचे अनेक हात धावून आले होते, तर रेस्क्यू टीमनेदेखील या घटनेमध्ये अथक परिश्रम घेतले. या घटनेमुळे महाबळेश्वर मार्गावर जाण्याचे धाडस अनेकांना होईनासे झाले तर ती आठवण आजही अनेकांच्या मनात ताजी आहे. या घटनेबाबत महाबळेश्वरमधील रेस्क्यू टीम यांनी महाबळेश्वरवरील प्रेम कमी करू नका, असे सांगितले.घटना घडून एक महिना पूर्ण झाला असून घटनेतील नेमके रहस्य काय हे आज तरी उलघडले नाही. किशोर चौगुले यांचे वडील पी. एम. चौगुले यांनी १३ आॅगस्ट २०१८ रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक रायगड यांना घटनेची सखोल चौकशी व्हावी म्हणून पत्र पाठविले आहे. मात्र आज तरी या घटनेतील गूढ उकलले नाही.अ३३ंूँेील्ल३२

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरीSatara areaसातारा परिसरDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायत