सूचकांसाठी सर्वच पक्षांची कसरत

By Admin | Updated: October 9, 2015 21:16 IST2015-10-09T21:16:05+5:302015-10-09T21:16:05+5:30

मंडणगड : नगरपंचायतीच्या निवडणुकीचा ज्वर चढला; दोन दिवसांत उमेदवारांची गर्दी --रणसंग्राम

All parties workout for indicators | सूचकांसाठी सर्वच पक्षांची कसरत

सूचकांसाठी सर्वच पक्षांची कसरत

मंडणगड : तालुक्यातील पहिली नगरपंचायत निवडणूक प्रत्येक राजकीय पक्षाने प्रतिष्ठेची बनवली आहे. मंडणगड नगरपंचायत निवडणुकीची नामनिर्देशनपत्र गुरुवारअखेर दाखल करण्यात आली आहेत. आता शहरात निवडणूक प्रचाराचा ज्वर चढू लागला आहे. सेना, काँग्रेस महाआघाडी या दोन पक्षांनी सर्व १७ प्रभागात आपले उमेदवार उभे केले आहेत, तर भाजपने १५ प्रभागात उमेदवार उभे केले आहेत. मनसेने तीन प्रभागात उमेदवार उभे केले आहेत तर अपक्ष म्हणून सलाम मुकादम, सालेम सयद, हरेश मर्चंडे, रेश्मा हरेश मर्चंडे आणि संजय राणे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. अपक्षवगळता प्रत्येक राजकीय पक्षाला उमेदवार शोधणे कठीण झालेले असतानाच उमेदवारांना सूचक मिळवणे फार कठीण झाले होते. यासाठी सर्वच पक्षांची दमछाक झाली. मुळातच शहराची ३५९२ एवढी कमी लोेकसंख्या आहे. त्यात २३५१ एवढे मतदार आहेत. काही जागरूक नागरिकांनी आपले प्रत्येक पक्षाजवळ असणाारे संबंध शाबूत ठेवण्यासाठी अनेक महिन्यांची घरपट्टी, पाणीपट्टी (कर) भरले नाहीत. त्यामुळे सूचक म्हणून कोणी विचारण्यास आले तर थकीत असल्याचे कारण पुढे करत इतरांजवळ वाईटपणा घेण्याचे टाळले आहे. यामुळे अर्ज भरणाऱ्या उमेदवाराला सूचक मिळणे फार कठीण बनले होते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार मिळाले, पण सूचक मिळत नाहीत, अशी अनेक उमेदवारांची अवस्था झाली.
तालुक्यातील पहिली नगरपंचायत निवडणूक आणि पहिल्यांदाच आॅनलाईन अर्ज भरण्याची पहिली वेळ असल्याने सर्वांनाच याची चिंता लागून राहिली होती. यामुळे नामनिर्देशनपत्र आॅनलाईन भरण्यासाठी सर्वच राजकारण्यांची धावपळ उडाली होती. १ तारखेला अर्ज विक्री सुरु झाली असली तरी आॅनलाईन अर्ज भरणे सक्तीचे असल्याने पाच तारखेपर्यंत अर्ज विक्रीची पाटी कोरी होती. संगणकावर अर्ज भरण्याचे प्रत्येकालाच कठीण बनले होते. त्यामुळे संगणकावर अर्ज भरण्याचे तंत्र आत्मसात केलेल्यांचा दर वधारला होता.
सोमवारपर्यंत अर्ज भरण्यात आलेले नव्हते. सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी हाती लिहिलेले अर्ज आॅनलाईन स्वीकारण्याची परवानगी दिल्याने इच्छुकांची आॅनलाईनच्या संकटातून सुटका झाली. या निवडणुकीच्या अनुषंगाने जातपडताळणीची आॅनलाईन प्रमाणपत्र ही पाहण्याची संधी मिळाली. प्रमाणपत्रांचा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे सात व शेवटच्या ८ तारखेला अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. आॅनलाईनचा व्याप व सूचकांच्या कमतरतेवर मात करत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: All parties workout for indicators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.