संगमेश्वरातील सर्वच बाजारपेठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST2021-04-11T04:30:49+5:302021-04-11T04:30:49+5:30
वीकेंड लाॅकडाऊनमुळे देवरूख बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली हाेती. (छाया : सचिन माेहिते) लाेकमत न्यूज नेटवर्क देवरुख : संगमेश्वर ...

संगमेश्वरातील सर्वच बाजारपेठा बंद
वीकेंड लाॅकडाऊनमुळे देवरूख बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली हाेती. (छाया : सचिन माेहिते)
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर तालुक्यात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सगळ्याच बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. माखजन, कडवई, आरवली, साखरपा या बाजारपेठेत कडक लॉकडाऊन पाळण्यात आला आहे.
तालुक्यात ठिकठिकाणी नाक्या-नाक्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मेडिकल आणि अत्यावश्यक सेवा वगळता सगळीच दुकाने बंद ठेवण्यात आली. या बंदमुळे नेहमीचे गजबजलेले रस्ते सुनसान झाले हाेते. वीकेंड लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर कोणीच नव्हते. सगळेच रस्ते निर्मनुष्य झाले होते. बंदला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाल्याने कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली नाही.
बंदमुळे देवरूख आगारातून ठरावीकच एस.टी.च्या फेऱ्या सोडण्यात आल्या. देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप, संगमेश्वरचे उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ठिकठिकाणी पाेलीस तैनात करण्यात आले हाेते.