दापोलीत दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:31 IST2021-04-11T04:31:38+5:302021-04-11T04:31:38+5:30

दापोली : देशी- विदेशी दारूविराेधात पाेलिसांनी धडक माेहीम हाती घेतली असून, दापोली पोलिसांनी वाकवली येथून ५ हजार ७७४ रुपयांची ...

Alcohol confiscated in Dapoli | दापोलीत दारू जप्त

दापोलीत दारू जप्त

दापोली : देशी- विदेशी दारूविराेधात पाेलिसांनी धडक माेहीम हाती घेतली असून, दापोली पोलिसांनी वाकवली येथून ५ हजार ७७४ रुपयांची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी पाेलिसांनी दाेघांवर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वाकवली मराठवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या दुकानाच्या मागील बाजूस ४६ वर्षीय जाधव नामक एका प्राैढ व्यक्तीकडे देशी-विदेशी दारू सापडली. त्यांच्यावर दारूबंदी कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत. त्याचबरोबर त्याच दिवशी ७.३० वाजेच्या सुमारास गणेश सातनाक (वय ३२) यांच्या राहत्या घराजवळ वाकवली गणेशनगर शिरशिंगे फाटा येथे इनामपांगारी रस्त्याच्या बाजूला जंगलमय भागात ३,५१२ रुपयांची गावठी हातभट्टीची दारू दापोली पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी गणेश सातनाक याच्यावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Alcohol confiscated in Dapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.