ऐनवील वेल्फेअर सोसायटीतर्फे खेडमध्ये पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:35 IST2021-08-13T04:35:21+5:302021-08-13T04:35:21+5:30
खेड : दापोली तालुक्यातील टेटवली गावातील ऐनरकर मोहल्ल्यातील ऐनवील वेल्फेअर सोसायटी या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत सलग १२ दिवस ...

ऐनवील वेल्फेअर सोसायटीतर्फे खेडमध्ये पूरग्रस्तांना मदत
खेड : दापोली तालुक्यातील टेटवली गावातील ऐनरकर मोहल्ल्यातील ऐनवील वेल्फेअर सोसायटी या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत सलग १२ दिवस पूरग्रस्तांसाठी श्रमदानातून व साहित्य पुरवठ्यातून मदत केली आहे. या संस्थेला अनेकांनी सामाजिक उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले.
कोकणात अतिवृष्टी झाल्यानंतर अनेकांनी चिपळूण, खेड व महाड या आपत्तीग्रस्त तालुक्यांना मदतीचा हात दिला. त्यामध्ये दापोली तालुक्यातील टेटवली येथील ऐनवील वेल्फेअर सोसायटी या संस्थेने खेड तालुक्यातील अलसुरे, आष्टी, खेड शहर तसेच चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते, दळवटणे, खोंडे, गोवळकोट, महाड येथील राजेवाडी, भुराव अशा पुरामुळे बाधित झालेल्या गावांना मदत केली आहे. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष हिदायत ऐनरकर, उपाध्यक्ष सुहैल ऐनरकर, जाकीर ऐनरकर, फरीद ऐनरकर, साहिल ऐनरकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.