शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

"अहो किती हा निर्लज्जपणा, विश्वासघातकी अन् गद्दारांमध्ये फरक असतो का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 13:55 IST

आदित्य यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा गद्दार म्हणत निशाणा साधला. 

मुंबई - शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आज रत्नागिरीतून सुरुवात झाली. आदित्य यांच्या स्वागतासाठी रत्नागिरीत ठिकठिकाणी बॅनर झळकले असून, यातील एक बॅनर चर्चेचा विषय ठरला. सध्या गाजत असलेल्य स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुकांत सावंत यांचा फोटो या बॅनरवर असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्यावरुन, खासदार विनायक राऊत यांनी भूमिका मांडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली. आदित्य यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा गद्दार म्हणत निशाणा साधला. 

जे झालं ते झालं, जी गद्दारी झाली ती झाली. आजची गर्दी पाहून एवढच सांगू इच्छितो की येथे शिवसेनाचा जिंकून येणार. मला आज याठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला दिसून येत आहेत, म्हणजे येथील महिला भगिनींनाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे, असे म्हणत आदित्य यांनी भाषणाची सुरुवात केली. तसेच, माझा हा कोकणातील दुसरा दौरा असून यापूर्वीही मी कोकण दौरा केला. निष्ठा यात्रेत, शिवसंवाद यात्रेतून मी कोकणात आलो होते. त्यावेळी, या गद्दारांचा मला मेसेज यायचा, मला निरोप यायचा की. आम्हाला विश्वासघातकी म्हणा पण गद्दार म्हणू नका, अहो किती हा निर्लज्जपणा... अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी आणि बंडखोरांवर तोफ डागली.  

विधानसभेच्या पायऱ्यावर आम्ही ५० खोके, एकदम ओकेच्या घोषणा देत होतो. त्यावेळी, हे बंडखोर आम्हाला उत्तर देताना म्हणायचे. तुम्हाला पाहिजे का, तुम्हाला पाहिजे का? म्हणजे त्यांनी खोके घेतले हे मान्यच केलं. देशाच्या इतिहासात ७५ वर्षांत एवढा निर्लज्जपणा पाहिलात का, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर, ५० खोके एकमद ओके ही घोषणाबाजीही केली. त्यांनी आदित्य ठाकरे ५० खोके.... असं म्हणायचे आणि एकदम ओके... अशा घोषणा उपस्थित लोकं देत होते. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी वेदांता प्रकल्पावरुनही सरकारवर जोरदार निशाणा साधला.  शिवसेनेतील बंडाळीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा सुरु केली आहे. या यात्रेच्यानिमित्ताने रत्नागिरीत १६ सप्टेंबर रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. आदित्य यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर झळकले. ज्याठिकाणी आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे, त्याचठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे भले मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, यातील एका बॅनरमुळे शहरात एकच चर्चा रंगू लागली, त्यावरुन आरोप-प्रत्यारोपही झाले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेRatnagiriरत्नागिरी