शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठातील संशोधनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस लाभ : कृषिमंत्री अब्दुल सत्तार 

By अरुण आडिवरेकर | Updated: December 14, 2022 18:48 IST

दापोलीत ५० वी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सयुंक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक

दापोली : विद्यापीठात झालेले संशोधन कार्य अत्यंत मोलाचे असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसोबत जीवनस्तर उंचाविण्यासाठी होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ५० वी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सयुंक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी अपर मुख्य सचिव (कृषी) एकनाथ डवले, महाराष्ट्र कृषी शिक्षक व संशोधन परिषद, पुणेचे महासंचालक रावसाहेब भागडे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू, डॉ. प्रशांतकुमार पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इन्द्रमणी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोल्याचे कुलगुरू डॉ. शरद गडाख उपस्थित होते.चारही कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनात त्या- त्या विद्यापीठातील संशोधन अवजारे बी बियाणे प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या प्रत्येक स्टॉलची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली.यानिमित्त दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात चारही कृषी विद्यापीठाचे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कौतुक केले. कमी कालावधीत शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरत असल्याचे यावेळी ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapodiदापोडीagricultureशेतीAbdul Sattarअब्दुल सत्तारFarmerशेतकरी