कृषी पर्यवेक्षक संघटनेचा पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST2021-09-02T05:07:20+5:302021-09-02T05:07:20+5:30
अडरे : चिपळूण आणि खेड येथील आजूबाजूच्या परिसरात महापुरामुळे शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना पुणे येथील महाराष्ट्र ...

कृषी पर्यवेक्षक संघटनेचा पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
अडरे : चिपळूण आणि खेड येथील आजूबाजूच्या परिसरात महापुरामुळे शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोज गांधी यांनी सामाजिक बांधीलकी जपत सोलापूरहून चादर, बेडशीट व सतरंजी मागवून १०० कुटुंबांना वाटप करण्यात आली.
या मदत वाटपावेळी जिल्हाध्यक्ष मनोज गांधी यांनी सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो शेतीच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. शेतकऱ्यांचे महापुरामुळे खूप माेठे नुकसान झाले आहे. सामाजिक बांधीलकी या भावनेने केलेली मदत यामुळे शेतकऱ्यांचे व आमचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे गांधी यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष संजय भिंगार्डे, संजय महाडिक, कोषाध्यक्ष जयेश काळोखे, सहसचिव लक्ष्मीकांत मांडवकर, टी. एन. शिगवण, एल. डी. शिंदे, दिलीप पवार, बी. एस. कोळी उपस्थित होते.