दापोली : राज्यातील अकृषी विद्यापीठाप्रमाणे चारही कृषी विद्यापीठांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणी साठी सुरू असलेले आंदोलन कृषी मंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आल्याची घोषणा कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे.राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गेले १४ दिवस ७ वा वेतन आयोग आणि लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनांचा लाभ मिळविण्याकरिता आंदोलन सुरू होते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काळी फित बांधून काम करण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद व सामूहिक रजा आंदोलन केले. तसेच काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.परंतु, १० नोव्हेंबर रोजी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासमवेत चारही कृषी विद्यापीठातील संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये इतर विद्यापीठांप्रमाणेच कृषी विद्यापीठांनाही सातवा वेतन आयोग लागू केला जाईल, असे ठोस आश्वासन कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्यामुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचारी यांनी बुधवारपासून आपला संप मागे घेतला आहे.
कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे आंदोेलन आश्वासनानंतर स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 19:36 IST
agriculture, andolan, dapoli, ratnagirinews राज्यातील अकृषी विद्यापीठाप्रमाणे चारही कृषी विद्यापीठांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणी साठी सुरू असलेले आंदोलन कृषी मंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आल्याची घोषणा कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे.
कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे आंदोेलन आश्वासनानंतर स्थगित
ठळक मुद्देकृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे आंदोेलन आश्वासनानंतर स्थगितकृषी मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोेलन स्थगित