शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : कादांटी खोरे महिन्यानंतर प्रकाशमान, वीज नसल्याने परिसर होता अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 18:20 IST

सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यात एक महिना वीज नसल्याने हा परिसर अंधारात होता. याबाबत लोकमतने १३ जुलै २०१७ रोजी कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थ अजून अंधारात या आशयाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली असून, या खोऱ्यात असलेल्या २१ गावातील ग्रामस्थांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकादांटी खोरे महिन्यानंतर प्रकाशमान वीज नसल्याने परिसर होता अंधारात

खेड : सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यात एक महिना वीज नसल्याने हा परिसर अंधारात होता. याबाबत लोकमतने १३ जुलै २०१७ रोजी कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थ अजून अंधारात या आशयाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली असून, या खोऱ्यात असलेल्या २१ गावातील ग्रामस्थांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.कांदाटी खोऱ्यातील ही एकवीस गावे कायम दुर्लक्षित असून, या गावांमध्ये १ जूनपासून विजेचा लंपडाव सुरू झाला होता. शिंदी वळवण येथील ग्रामस्थ सदानंद मोरे यांनी ही समस्या प्रसारमाध्यमांच्या कानी घातली. यानंतर यासंबंधी वृत्त प्रसिद्ध होताच कांदाटी खोऱ्यातील महावितरणची यंत्रणा जागी झाली. महावितरणची सारी यंत्रणा या खोऱ्यात कामाला लागली होती.खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा कांदाटी खोऱ्याला जोडला असल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी खेड शहराशी संपर्क साधला. वाई येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रशांत चोरमले यांनी तत्काळ कांदाटी खोऱ्यातील तापोळा येथील कनिष्ठ अभियंता एस्. वाय्. झरे यांच्याशी चर्चा करून हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

रघुवीर घाटामुळे आम्हाला आमच्या व्यथा किमान मांडता येतात. अन्यथा चहु बाजूने पाणीच असलेल्या या खोऱ्या तील एकवीस गावातील ग्रामस्थांचा आवाज शासन दरबारी पोहोचणे मुश्किलच आहे.- सदानंद मोरे, ग्रामस्थ, शिंदी - वळवण

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरीSatara areaसातारा परिसर